Published On : Tue, Jan 28th, 2020

पर्यावरणाचे संतुलन राखण्‍यासाठी ‘’सिंगल युज प्‍लास्‍टिक’’ चा उपयोग टाळावा -पर्यावरण प्रेमी, श्री निलेश खांडेकर

‘’एकदाच उपयोग होणारे प्‍लास्‍टिक’’ पर्यावराणा साठी धोकादायक आहे , संशोधनावर आधारित उदाहरण सांगून अश्‍या प्‍लास्‍टिकचा वापर न करण्‍याचा सल्‍ला वनराई चे सचिव श्री निलेश खांडेकर यांनी ‘’ नो टू सिंगल युज प्‍लास्‍टिक ‘’ विषयावर आयोजित कार्यक्रमात विचार व्‍यक्‍त केले.

भारत सरकारच्‍या सूचना व प्रसारण मंत्रालया अन्‍तर्गत कार्यरत लोक संपर्क ब्‍यूरो नागपुर आणि राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण संस्‍थान एवं भूमि उपयोग नियोजन, अमरावती रोड, नागपुरच्‍या सहयोगाने डॉ. एस.पी. रॉयचौधरी ऑडीटोरियम, नागपुर येथे ‘’नो टू सिंगल युज प्‍लास्‍टीक’’ विषया वर कार्यक्रम आयोजित करण्‍यात आला . या कार्यक्रमाचे उद्घाटन वनराई चे सचिव श्री निलेश खांडेकर यांच्‍या हस्‍ते झाले. याप्रसंगी यावेळी डॉ. राजीव मराठे, प्रधान वैज्ञानिक , NBSS & LUP, Nagpur यांनी मार्गदर्शन करतांना प्‍लास्‍टिकच्या वापराच्‍या नुकसाना बद्दल माहिती देऊन ते स्‍वत: आपल्‍या दैनंदिन जीवनात प्लास्‍टिकचा वापर कसा टाळतात या बद्दल माहिती दिली.

तसेच डॉ. आर.पी. शर्मा, वरिष्‍ठ वैज्ञानिक यांनी ‘’नो टू सिंगल युज प्‍लास्‍टीक’’ या विषयावर मार्गदर्शन भाषणात सांगितले की प्लास्‍टिकच्‍या उपयोगाचा धोका सर्वांना माहित असून सुद्धा लोक प्लास्‍टिकचा वापर करतात त्‍यांनी आपली मानसिकता बदलावी आणि एकदा वापराच्‍या प्‍लास्‍टिकच्‍या वापरावर बहिष्‍कार टाकावा .

या कार्यक्रमांतर्गत, प्रश्‍न मंजुषा स्‍पर्धेचे आयोजन करून विजेत्‍यांना ब्यूरोतर्फे बक्षिसे देऊन सम्‍मानित करण्‍यात आले. कार्यक्रमाचे प्रास्‍ताविक मीना जेटली, सहायक निदेशिका यांनी केले तर संचालन डॉ. एम. एस. रघुवंशी, प्रधान वैज्ञानिक यांनी केले आणि आभार , संजीवनी निमखेडकर, यांनी मानले. या कार्यक्रमास राष्‍ट्रीय मृदा सर्वेक्षण आणि भूमि उपयोग नियोजन संस्‍थान, अमरावती रोड, नागपुर चे अधिकारी व कर्मचारी उपस्‍थित होते. कार्यक्रम यशस्‍वी करण्‍या करिता क्षेत्रीय लोक संपर्क ब्‍यूरोचे तांत्रिक सहायक संजय तिवारी यांनी विशेष परिश्रम घेतले.