Published On : Sun, Aug 9th, 2020

विमानाच्या गतीने धावणार रेल्वे गाडी

Advertisement

-भारतीय रेल्वेत वेगवान क्रांती,देशातील संशोधकांचा आविष्कार,नागपूर-मुंबई मार्गाची निवड


नागपूर: डोळ्याची पापणी लवण्याआधीच ती वेगाने निघून जाईल. बंदुकीची गोळी आणि विमानाच्या गतीपेक्षाही तिचा वेग अधिक असेल, याही पलीकडे विचार केल्यास ध्वनी आणि प्रकाशाच्या वेगाप्रमाणे तिची गती असेल, जगाच्या पाठीवर अशी वेगवान क्रांती रेल्वेत झाली आहे. कालांतराने हा चमत्कार भारतीय रेल्वेच्या रुळावर पाहावयास मिळणार आहे. जगातील सर्वात वेगवान हायपरलूप ट्रेन (प्रकल्प) भारतीय रुळावरून धावेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मेक इन इंडिया अंतर्गत या प्रकल्पाला गती मिळाल्यास देशात वेगवान क्रांती घडेल आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. पेट्रोल, डिझेलच्या समस्येवर हायपरलूप ट्रेन क्रांती ठरेल. व्हॅक्युम सिलेंडरच्या आत खुपसारे चुंबकीय गोळे असतात. यातून हायपरलूप ट्रेन धावते.

अलिकडेच तत्कालीन रेल्वे मंत्री, रेल्वे मंडर्ळ आणि रेल्वे मंत्रालयातील अधिकाèयांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडलेल्या एका परिषदेत हायपरलूप या गाडीचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. ही गाडी चालविण्यासाठी दिल्ली-मुंबई, मुंबई-चेन्नई, मुंबई-पुणे आणि बंगळुरू-तिरुवनंतपुरम् हे मार्ग प्राथमिक आणि तात्पुरत्या स्वरूपात निश्चित करण्यात आले आहे. अमेरिकेतील लास वेगास या शहरात या गाडीची चाचणी घेण्यात आली. दुबईतही प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. अमेरिकेतील एलन मस्क येथे २०१३ मध्ये तयार झालेल्या गाडीला स्पेस एक्स या कंपनीने हायपरलुक असे नाव दिले. ही गाडी ताशी १२०० किमीच्या गतीने धावते. तर मॅगलेव्ह ट्रेन चालविण्यासाठी नागपूर-मुंबई मार्गाची निवड करण्यात आली आहे. तसेच चेन्नई-बंगळुरू, हैदराबाद-चेन्नर्ई आणि नवी दिल्ली – चंदीगढ याही मार्गांचा समावेश आहे. या गाडीसाठी भारतीय रेल्वेने काही विदेशी कंपन्यांना आमंत्रित केल्याची माहिती सूत्रांनी दिली. गाडी रुळावर आल्यास भारत हा चीन आणि जपानपेक्षाही पुढे जाईल.

मॅगलेव्ह ट्रेन जपानमध्ये तयार करण्यात आली असून जपानमधील माऊंट फुजीजवळ ही चाचणी घेण्यात आली. चुंबकीय शक्ती असलेल्या गाडीची चाके रुळाला स्पर्श न करता म्हणजे रुळाच्या २ सेंटी मीटर वर हवेत उडताना दिसतात. यासाठी मुख्य भूमिका चुंबकीय प्रणालीची असेल. या गाडीची गती ६०० वरून पुढे ताशी ८०० आणि १२०० किमी प्रती तास करता येऊ शकते. ही गाडी पूर्णपणे पर्यावरणानुकूल आहे. विशेष म्हणजे अपघाताची शक्यता नाही. गाडीत काही त्रुटी असल्यास ते आधीपासूनच कळेल. त्यामुळे आधीच समस्या सोडविता येतील. विजेऐवजी सौरऊर्जेवरही गाडी चालू शकते.

देशातच तयार झाले मॉडेल
मध्य प्रदेशात या गाडीचे मॉडेल बनविण्यात आले. दहा वर्षांच्या प्रयत्नानंतर राजा रमण्णा सेंटर फॉर अर्वीरपलश एडव्हान्स टेक्नॉलॉजी (आरआरसीएटी) चे शास्त्रज्ञ डॉ. qशदे आणि त्यांच्या ५० सहकाèयांचे हे एक मोठे यश आहे. या गाडीसाठी हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील (सुंदरग्रामपंचायत जयदेवी) मॅग्लेव फॅक्टरीतून चुंबक पुरविण्यात आले. हे तंत्रज्ञान विदेशात विकसित झाले असले तरी आता भारतातच या गाडीचे मॉडेल तयार करण्यात आले.

पुणे-मुंबई हायपरलूप
पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारने व्हर्जिन हायपरलूप वन-डीपी वल्र्ड कन्सोर्टियमला मान्यता दिली असून ते मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवास ३५ मिनिटात पूर्ण करण्याचे स्वप्न साकार करू शकतात. हायपरलूप चालवणारे महाराष्ट्र पहिले राज्य असेल. राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र जगातील पहिली हायपरलूप परिवहन व्यवस्था स्थापित करेल आणि जागतिक हायपरलूप पुरवठा साखळी पुणे येथून सुरू होईल.