Published On : Wed, Dec 26th, 2018

रेल्वे गाडीत पाणी भरणारे झाले बेरोजगार

कंत्राटी कामगारांवर उपासमारीची पाळी

नागपूर: नागपूर रेल्वे स्थानकावर येणाºया रेल्वे गाड्यात पाणी भरणारे १०५ कंत्राटी कामगारांना अचानक कामावरुन कमी करण्यात आले. एकाच रात्री हा निर्णय झाल्याने त्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली. आपल्याला काम मिळावे, या मागणीसाठी सर्व कामगार बुधवारी सकाळी डीआरएम कार्यालय परिसरात गोळा झाले.

दररोज १२५ पेक्षा अधिक प्रवासी गाड्या नागपूर मार्गाने जातात. या पैकी काही गाड्यांची देखभाल नागपुरात केली जाते. याशिवाय अनेक गाड्यांच्या बोगीत पाणी भरले जाते. या पाण्याचा उपयोग शौचालय आणि वॉश बेसिंगसाठी प्रवासी करतात. याकामासाठी रेल्वे तर्फे कंत्राट दिले आहे. गेल्या वर्षभरापासून १०५ कर्मचारी तीन पाळीत काम करीत आहेत. त्यांना कामगार कायद्याप्रमाणे पीएफ आणि ईएसआयसी लागु करण्यात आले आहे.

मात्र, मंगळवार पासून नविन कंत्राटदाराच्या हाती हे काम देण्यात आले. त्यामुळे या कंत्राटदाराने जुन्या १०५ कर्मचाºयांना कामावर ठेवण्यास नकार दिला आहे. मंगळवारी रात्रपाळीतील २२ कामगार कामावर आले. मात्र, त्यांना आल्या पावलीच परतावे लागले. या प्रकारामुळे कामगारात संतापाची लाट पसरली. सर्व कामगार बुधवारी सकाळी डीआरएम कार्यालय परिसरात आले. जुन्या कामगारांना काम मिळाले, अशी त्यांची मागणी होती.

बेरोजगार झालेल्या कामगारांनी दिलेल्या माहिती नुसार ज्यांचा पीएफ कापल्या जातो, अशा कामगारांना कामावर न ठेवता नविन कंत्राटदाराने सोबत आपले कामगार आनले आहे. त्यामुळे जुन्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. पीएफ आणि ईएसआयसीसह जुन्याच कामगारांना कामावर घेण्यात यावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. मात्र, रात्री उशिरापर्यंत त्यांचा प्रश्न सुटला नव्हता. जुन्या कामगारांना काम मिळाले नाही तर काम बंद होण्याची शक्यताही नाकाराता येत नाही.याचा परिणाम रेल्वे गाड्या आणि प्रवाशांवर होण्याची शक्यता आहे.