Published On : Thu, Apr 29th, 2021

वाघ ने ट्रॅक्टर ने केली सोडियम हायफ्लोक्लोराईड ची फवारणी

Advertisement


कामठी :-ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यातील महत्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनो कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुढाकार घेत ट्रॅक्टर ने गावात सोडियम हायफोक्लोराईड ची फवारणी केली तर एका महिला सरपंचाने पुढाकार घेऊन फवारणी चा उपक्रम राबविल्याने कढोली गावातील समस्त ग्रामस्थांनि सरपंच प्रांजल वाघ यांचे कौतुक केले जात आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गावातील ग्रामस्थांना कोरोना विषाणूची लागण होऊ नये यासाठी कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत चे महिला सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी खुद्द पुढाकार घेत ट्रॅक्टर वर बसून सोडियम हायफोक्लोराईड औषधीची सर्वत्र फवारणी केली.गावातील संपूर्ण रस्ते, गल्ल्या आणि गावाला लागून असलेल्या मार्गावर सुदधा विविध औषधांची फवारणी केली.जेणेकरून कोणतीही रोगराई गावात येऊ नये हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

ग्रामपंचायती च्या वतीने हायफोक्लोराईड सोडियम चे मिश्रण गाव परिसरात केली जात असुन कोरोनाचा वाढता प्रदूर्भाव लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंध लावून संचारबंदी लागू करण्यात आली आहे परिणामी गावात शुकशुकाट पसरलेला असतो मात्र कोरोना विषानूची गंभीरता लक्षात घेता सरपंच प्रांजल वाघ यांनी स्वतःच्या गावाची सुरक्षा करण्यासाठी पुढाकार घेत सदर फवारणी चा उपक्रम हाती घेतला आहे.वास्तविकता आपल्या गावात एखादा रुग्ण ही कोरोनाबधित म्हणून सापडू नये किंवा आपत्कालीन परिस्थितीत आपल्या गावलाही त्याची किमत मोजू लागता कामा नये यासाठी ग्रामपंचायत सरपंच प्रांजल वाघ यांनी विविध उपक्रम राबवित दररोज सोडियम हायफोक्लोराईड ची फवारणी चा उपक्रम राबवित आहेत.