शिवअन्नपूर्णा मंदिर बुटी बोरी येथील घटना
बुटी बोरी पोलिसांची कामगिरी
नागपूर:- सोमवारच्या मध्यरात्री बुटीबोरी बाजार ओळीतील शिव अन्नपूर्णा मंदिरातील दानपेटी चोरट्यांना बुटी बोरी पोलिसांनी अवघ्या १२ तासात अटक केली.ताराचंद तुळशीराम चौधरी,वय ५०, रा वर्धा, व अनिल कोमल सहानी,वय २४,रा कवडीराम,उत्तरप्रदेश,दोघेही हल्ली मुक्कामी सातगाव असे आहे.
सविस्तर वृत्त असे की,दोन्ही आरोपी हे बुटीबोरी नजीक सातगाव येथे सध्या वास्तव्यास असून भंगार वेचून विकण्याचे काम करतात.सोमवारच्या रात्री दोन्ही आरोपींनी संगनमत करून बुटी बोरी बाजार ओळीतील शिव अन्नपूर्णा मंदिरातील दानपेटी फोडुन त्यातील चिल्लर व रोकड लंपास केल्याची तक्रार फिर्यादी पराग वैरागडे यांनी बुटी बोरी पोलिसात केली होती.त्या अनुषंगाने बुटी बोरी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन चोरीच्या संदर्भात चोरट्यांचा छडा लावण्याकरिता मंदिरातील सी सी टी व्ही फुटेज च्या आधारे शोध मोहीम सुरू केली व तपासला वेग दिला असता पोलिसांना मिळालेल्या गुप्त सूचनेनुसार घटनेतील मुख्य आरोपी ताराचंद हा समृद्धी हॉटेल च्या पाठीमागे लपून बसल्याचे माहीत होताच पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले.
त्यानंतर ताराचंद ला खादीचा हिसका दाखवताच चोरी केल्याचे कबुल करून घटनेतील सहारोपी अनिल सहानी याचेबाबद माहिती पोलिसांना दिली.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी अनिल यालासुद्धा नागपूर वरून ताब्यात घेऊन मंदिरातील दानपेटीतील लंपास केलेली २४१६ रुपयांची नाणी हस्तगत केली.सबब कामगिरी बुटी बोरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांचे मार्गदर्शनात पो उप निरीक्षक संजय भारती, पो ह मिलिंद नांदूरकर,सत्येंद्र रंगारी,राजू कापसे,राकेश तालेवार यांनी पार पाडली.
विशेष बाब म्हणजे,दोन्ही आरोपी हे भुरटे चोर असून यापूर्वीही ताराचंद यांचेवर २०१७ ला बुटी बोरी पोलीस स्टेशन येथे १२२ अंतर्गत गुन्हा दाखल आहे.