Published On : Tue, Oct 3rd, 2017

बोरी जि प शाळेच्या विद्यार्थ्यांचे सुयश

कन्हान : ” स्वच्छता हीच सेवा ” या उपक्रमा अंतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धा मध्ये जि.प.बोरी ( सिंगोरी ) शाळेच्या विद्यार्थ्यांनी संपादन केलेल्या यशा बद्दल बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

जिल्हा परिषद नागपूर शिक्षण विभागाचा उपक्रम ” स्वच्छता हीच सेवा ” शाळा स्वच्छता अभियान अंतर्गत पचायत समिती पारशिवनी च्या शाळांमध्ये रांगोळी, चित्रकला, घोष वाक्यं अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या उपक्रमाचे समापन बनपुरी येथे करण्यात आले. या कार्यक्रमास प्रामुख्याने मा. असिम गुप्ता प्रधान सचिव ग्राम विकास मंत्रालय, मा. कादंबरी बलकवडे मुख्य कार्यकारी अधिकारी, मा. निशाताई सावरकर अध्यक्षा जि प नागपूर, मा. शरद डोणेकर उपाध्यक्ष जि प नागपूर, मा.दिपेंद्र लोंखडे शिक्षणाधिकारी (प्राथ) मा. प्रशांत मोहोड सहाय्यक गट विकास अधिकारी, मा. विकास काटोले गट शिक्षणाधिकारी आदीसह प स पारशिवनीचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

मा. असिम गुप्ता हयांनी ” स्वच्छता हीच सेवा ” अभियान उत्तमरित्या राबविल्याबद्दल बनपुरी ग्राम पंचायत, जि प शाळा व गावक-यांचे अभिनंदन करून गौरव उद् गाराने प्रसंशा केली. याप्रसंगी प स पारशिवनीचे कन्हान केंद्रातील बोरी ( सिंगोरी ) जि प उच्च प्राथमिक शाळेतील १) कु. सुहानी रामचंद्र येवले,प्रथम पुरस्कार स्वच्छता चित्रकला, कु.सोनु विनायक नाकाडे प्रथम पुरस्कार स्वच्छता रांगोळी, ३) कु. ऑचल मुन्नाजी वैदय व्दितीय पुरस्कार घोष वाक्यं या विद्यार्थ्याना मा. असिम गुप्ता, मा. दिपेंद्र लोंखडे, मा. निशाताई सावरकर आदी मान्यवरांच्या शुभ हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यान मध्ये नवचैतन्य निर्माण झाले. या विद्यार्थ्याना जि प उच्च प्राथमिक शाळा बोरी (सिं.)चे प्रभारी मुख्याध्यापक शांताराम जळते, सुरेश चांदुरकर, अरविंद नंदेश्वर अनिता दुबळे, ममता डहाटे हयांनी मार्गदर्शन केले. बोरी शाळेच्या विद्यार्थ्याच्या सुयशा बद्दल गावकरी, नागरिक व सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.