Published On : Fri, Jan 11th, 2019

रामटेक येथे राज्यस्तरीय भव्य कृषी समृद्धी महोत्सव सम्पन्न

कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी वरदान -कृषी व पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांचे प्रतिपादन

रामटेक: महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभाग,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने कृषी समृद्धी महोत्सव 2018 -19 राज्यस्तरीय कृषी व पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याचा नुकताच रामटेक नेहरू मैदानावर कृषिप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.या कृषी व पशु प्रदर्शनीला कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री महादेवजी जानकर यांनी भेट दिली आणि” या कृषी प्रदर्शनामुळे शेतकऱ्यामध्ये नवा आत्मविश्वास निर्माण होणार असून शेतीत नवनवे प्रयोग करायला चालना मिळेल.

किफायतशीर आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून शेती करता येईल तसेच पारंपरिक पद्धतीने शेती करतांना आधुनिक पध्दतीने शेती करून शेतकऱ्याला आपला विकास करता येईल. शेतकऱ्याला विविध प्रकारचे ज्ञान असल्याशिवाय समृद्ध शेती करता येणार नाही. अशा प्रकारची कृषी प्रदर्शने शेती व शेतकऱ्यांना उपयुक्त असून शेती विकासासाठी ती वरदान ठरणार आहेत”असे विचार कृषी प्रदर्शनी भेटीदरम्यान व्यक्त केले.४ दिवसीय कृषी प्रदर्शनीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे चित्र निदर्शनास आले.

या कृषी समृद्धी प्रदर्शनाचा समारोप माननिय लोकप्रिय आमदार रेड्डी साहेब ह्याचे अध्यक्षतेखाली पार पडला.यावेळी ते म्हणाले की,”शासन शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या सोयीसवलती व सुविधा उपलब्ध करून देत आहे. पण शेतीच्या विकासासाठी शेतकऱ्यांना आजच्य काळात शेतीक्षेत्रात होत असलेले बदल व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर याविषयीची माहिती मिळणे आवश्यक आहे.शेतकऱ्यांना शेती करतांना लागणाऱ्या सवलती तसेच सोयीसुविधा यांची माहिती मिळावी आणि प्रगतिशील शेती करतांना ती कशी करावी .विविध यंत्र,सौरऊर्जा यंत्र,वर्षभरात वेगवेगळी पिके घेऊन आपले जीवनमान उंचावण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करता यावे आणि शेतकऱ्यांकरिता राबविण्यात येणाऱ्या प्रत्येक योजनेची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहवावी व ती माहिती एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी या हेतूने हे प्रदर्शन आयोजित केले गेले आहे.शेती व शेतकऱ्यांचा विकास याला आमचे प्राधान्य आहे.”

7ते 10 जानेवारी अशी 4दिवस कृषि प्रदर्शनी व पशुप्रदशनीचे आयोजन शेतकऱ्यांसाठी रामटेक येथील नेहरू ग्राऊंडवर करण्यात आले होते .या कृषी समृद्धी महोत्सवाला शेतकऱ्यांनी भरघोस प्रतिसाद दिला.


भव्य कृषी व पशु प्रदशनीमध्ये बीज ,कीटकनाशके, मोटार फवारणी, ट्रॅकर, शेतीला उपयुक्त उपकरणे,सिंचनाची साधने,ग्रीन हाऊस ,खाद्यपदार्थ तसेच गृहपयोगी वस्तूंचे ,शेतीकरिता रोजगार समूह बचत गट आणि पशु संवर्धन,मत्स्य विभाग,रेशीम उद्योग, समाजिक वनीकरण, सौरऊर्जा तसेच पीक विमा, पीक कर्ज फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मोफत मातीपरिक्षण इत्यादी स्टॉल लावण्यात आले होते. शेतकऱ्यांनि तयार केलेल्या गृहपयोगी वस्तू व खाद्यपदार्थ यांचीही शेतकऱ्यांनि विक्री केली.बँकांची कर्जे व सोयीसवलती ,शेतकऱ्यांनि तयार केलेली फळझाडे -फुलझाडे हेही प्रदर्शनात विक्रीसाठी उपलब्ध होते.शेतकाऱ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या समस्त योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी व त्यासंदर्भातील माहिती एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी हा एकच उद्देश ठेऊन यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आपल्या भाषणात सांगितले. महादेव जानकर यांचे हस्ते पशु मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले.

ह्यावेळी उत्तम प्रतीची जनावरे पाळणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.या मेळाव्यात उत्तम प्रकारे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आमदार मल्लिकार्जुन रेड्डी ,उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार धर्मेश फुसाटे ,मुख्याधिकारी खरगे,यांचे हस्ते शेतकऱ्यांना ४० हजार व १ लाख रुपयांचे अनुशेशाचे प्रमाणपत्र देण्यात आले.

ह्यावेळी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, उपाध्यक्ष प्रभाकर खेडकर, नगरसेविका कविता मूलमुले, वनमाला चौरागडे , चित्रा धुरई, जिल्हा परिषद उपाध्यक्ष शरद डोनेकर,पंचायत समिती सभापती किरण धुर्वे,जिल्हा पशु संवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुळकर, माजी भारतीय खाद्य निगम सदस्य विजय हटवार, शेतकरी किसान नेते नरेंद्र बंधाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपविभागिय कृषि अधिकारी अंबादास मिसाळ,तालुका कृषी अधीकारी बडोले, तालुका कृषी अधीकारी पारशिवनी गच्चे , ताकृअ मौदा वासनीक ,डॉक्टर नगराळे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर डॉ. नवलाखे आदी मान्यवर उपस्थित होते.ह्यावेळी रामटेक, मौदा ,पारशिवनी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.दरम्यान जागलगूतथा हा विनोदी हास्य कार्यक्रम रामपाल महाराज यांनी सादर केला.या सम्पूर्ण प्रदर्शनाच्या यशस्वीतेकरिता कृउबास रामटेक चे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे ,उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले व सर्व सदस्यगण ,सर्व विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वर्ग यांनी प्रयत्न केले.