Published On : Sat, Apr 18th, 2020

राज्य उत्पादन शुल्क विभागाने केले 125 लिटर मोहा दारू जप्त

नागपुर :- राज्य उत्पादन शुल्क विभागाने आज पहाटे पासून ग्रामीण भागातून अवैधरित्या येणाऱ्या हातभट्टी दारूच्या वाहतुकी पकडण्यासाठी विविध ठिकाणी सापळे लावले होते. यामध्ये चार दुचाकी वाहनासह 125 लिटर मोहा दारू जप्त करून 2 लाख 1 हजार 875 किमतीचा दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त केला.

उमरेड तालुक्यातील वडद व कळमेश्वर तालुक्यातील गोंडखैरी या ठिकाणांहून हातभट्टी दारूची नागपूर शहरात वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाल्यावरून सापळे लावला असता १) विलास केलस काटे फकिरा वाडी धंतोली, २) अरुण रामकृष्ण देशमुख सरइ पेठ सम्राट अशोक चौक,३) सोनू गोविंद यादव कुंजीलाल पेठ ४) अविनाश चंद्रकांत परतेकी – पाचगाव रोड नागपूर हे इसम त्यांचे कडील दुचाकी वाहन क्रमांक १) MH 31 AR 1599 २) MH 40 AH 3673 ३) MH 31 DJ 7489 ४) वाहन पासिंग नाही. या वाहनाने मोहा दारूची वाहतूक करीत असताना मिळून आले. त्यामुळे त्यांचे वर दारूबंदी गुन्हा अंतर्गत कारवाई करण्यात आली असून सदर चारही वाहने व 25 लिटर हातभट्टी मोहा दारू जप्त करण्यात आली आहे.

सदरची कारवाई अधीक्षक प्रमोद सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली निरीक्षक रावसाहेब कोरे यांनी केली. या कारवाईत कॉन्स्टेबल अमोल बोथले व महिला जवान सोनाली खांडेकर यांनी ही मोहीम यशस्वी केली.