Published On : Sat, Mar 17th, 2018

नागपुरात सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रक्रियेला वेग

Advertisement


नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने स्थानिक कस्तुरचंद पार्क येथे सर्वात उंच राष्ट्रध्वज उभारण्याच्या प्रक्रियेने वेग धरला आहे. माजी महापौर प्रवीण दटके समितीने यासंदर्भात आज बैठक घेऊन प्रक्रियेच्या प्रगतीची माहिती घेतली. येत्या १५ ऑगस्ट रोजी महापौरांच्या हस्ते हा ध्वज फडकावा, यादृष्टीने प्रयत्न केले जात असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली.

बैठकीला समितीचे अध्यक्ष माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, समितीचे सदस्य विजय (पिंटू) झलके, नगरसेवक दीपक चौधरी, एनईएसएलचे संचालक डॉ. रिजवान सिद्दिकी, कार्यकारी अभियंता (प्रकल्प) नरेश बोरकर उपस्थित होते. सदर बैठकीत राष्ट्रध्वज उभारण्याच्या कार्यात काय अडथळे आहेत, त्याबाबत चर्चा करण्यात आली. २३ मार्च रोजी हेरिटेज समितीच्या बैठकीत सदर विषय असून ज्या काही अडचणी असतील, त्या दूर करण्यात येईल, अशी माहिती समितीचे अध्यक्ष प्रवीण दटके यांनी दिली.

Advertisement
Advertisement

Gold Rate
Saturday 22 March 2025
Gold 24 KT 88,100/-
Gold 22 KT 81,900 /-
Silver / Kg 98,000 /-
Platinum 44,000 /-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above