Published On : Mon, Nov 18th, 2019

कामठीत तीन दिवसीय मंडईची दुययंम तमाशाने सांगता

कवि संमेलन, लावणी नृत्य ,दुय्यम खडा तमाशा ने कामठीकर झाले मंत्रमुग्ध

कामठी:-दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा कामठी मंडई उत्सव समितीच्या वतीने रुई गंज मैदानावर आयोजित तीन दिवसीय मंडई उत्सवाची आज रवीवारला झालेल्या दुय्यम तमाशाने सांगता करण्यात आली. कवि संमेलन, लावणी नृत्य ,दुय्यम खडा तमाशा चा कामठी तील नागरिकांनी चांगलाच आनंद घेत मंत्रमुग्ध . झाले.

या तीन दिवसीय मंडई चा शुभारंभ नगराध्यक्ष मो शहाजहा शफाअत यांच्या मुख्य उपस्थितीत करण्यात आले तर मंडई उत्सवाचे उद्घाटन शुक्रवार ला कविसंमेलनाने करण्यात आली ज्यामध्ये भोपाल ,इंदोर, मुंबई, अकोला येथून आलेल्या कवींनी एकापेक्षा एक बहारदार कविता रचना सादर करून नागरिकांना मंत्रमुग्ध केले शनिवार ला सायंकाळी 8 वाजता सुमारास नागपूर येथील लावणी सम्राट छाया यांच्या समूहाने श्री गणेश वंदना, पिकलं जांभूळ तोडू नका ,माझ्या नवऱ्याने सोडलिया दारु ,ढोलकीच्या तालावर , सोडा राया नाद खुळा ,सोळावं वरीस धोक्याचं एकापेक्षा एक बहारदार लावणी नृत्य सादर करून रसिकांनी मंत्रमुग्ध होऊन टाळ्यांच्या पाऊस पाडून वन्स मोर म्हनू लागले.

तर रविवार ला सकाळी दहा वाजता सुमारास राष्ट्रीय सांस्कृतिक लोक कला मंच कलगी मंडळ जुनी वस्ती रणाळा कामठी व भारतीय कलँगी शाहीर मंडळ कळमना नागपूर या दोन गटांचा दुय्यम तमाशा सादर केल्यानंतर मंडई उत्सव कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या दुय्यम तमाशात शाहीर रामू धुर्वे,रामभाऊ बोन्द्रे, वसंता गोंडाळे , खुशाल शेंदरे, कमलेश शेंदरे, विजुराव भालेराव, विकास बोभडे, अमित गिरी, चंद्रशेखर भोयर, आदींनी कला प्रदर्शन केले तर दोन्ही शहरांनी एकापेक्षा एक बहारदार शेर शायरी करीत हुंडाबळी, दारूबंदी ,स्वच्छता अभियान ,शेतकरी आत्महत्या ,राष्ट्रीय एकात्मता यावर पोवाडे

जनजागृती सादर करून प्रेक्षकांना रिजविले.या तीन दिवसीय मंडई उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी साठी उत्सव समितीचे अध्यक्ष शेषराव ढबाले कार्यकारी अध्यक्ष विनोद कास्त्री , स्वागताध्यक्ष किशोर गेडाम ,कैलास मलिक ,राजेश सहारे, जे डी मेश्राम ,विनोद शर्मा, चंद्रशेखर अरगुल्लेवार, राजू चकोले ,नरेश नायडू , शयामु महेंद्र आकाश देशपांडे ,अनिल तिरपुडे ,खुशाल शेंदरे, प्रकाश यादव ,शेरू संगेवार , देवेंद्र डबले ,अजय डोंगरे , यांनी परिश्रम घेतले

संदीप कांबळे कामठी