कन्हान : – नगरपरिषद क्षेत्रात एक रूग्ण कोरोना (कोविद१९)पॉझीटीव्ह आढळ ल्याने प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन परिस रातील सात कि मी आत मधिल ग्राम पंचायत अंतर्गत गावाच्या सिमा सिल करून या संसर्गजन्य रोगा विषयी अति दक्षता घेण्यात येत आहे.
कन्हान-पिपरी नगरपरिषदेत एक कोरोना आजाराचा रूग्ण आढळल्याने परिसरातील लोकांची नेहमी ये-जा अस ल्याने या आजाराचा प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन कांद्री, टेकाडी(को.ख), जुनीकामठी, गोंडेगाव, घाटरोहना (एंस बा) नांदगाव, वराडा, बोरडा(गणेशी), खंडाळा, निलज, बोरी(सिंगारदिप) या सात कि मी च्या आत ग्राम पंचायत अंतर्गत गावाच्या सिमा सिल करून गावात येणा-या जाणा-या ची नोंद करण्यात यावी.
गावात कोरोणा विषाणु विषयी जनजागृती करून शासनाच्या सुचना व नियमाची काटेकोर पणे पालन करण्यात यावे. सर्दी, खोकला आजारां च्या व्यकतीना आरोग्य विभागाकडे पाठवुन उपचार त्वरित करावे.
गावात फवारणी करून सॅनिटाईझरेशन करावे, लॉकडाऊनचे पुर्णपणे पालन करण्यात यावे. मा मुख्य कार्यकारी अधिकारी जि प नागपुर हयानी दुरध्वनीवरून निर्देश दिल्याने गट विकास अ़धिकारी प्रदीप बम्हनोटे हयानी सरपंच व सचिव हयाना कार्यवाही करून अमलबजावनीचा अहवाल पाठविण्यात यावा.अशा आदेश दऊन स्वत: ग्रा प ला भेट देऊन पाहणी करून गाव सिमा बंद करण्यात आल्या ची सहनिशा केली.