Published On : Tue, Feb 16th, 2021

आरोग्य सेवकांच्या कोव्हिड लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू

नागपूर : केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आरोग्य सेवकांना देण्यात येणा-या कोव्हिड लसीकरणाच्या दुस-या टप्प्याला सोमवार (१५ फेब्रुवारी)पासून सुरूवात झाली. पाचपावली स्त्री रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), डागा रुग्णालय व एम्स मध्ये दुस-या टप्प्यात आरोग्य सेवकांना लस देण्यात आली.

नागपूर शहरामध्ये १६ जानेवारीला कोव्हिड लसीकरणाची सुरुवात झाली होती. त्याचा दुसरा टप्पा २८ दिवसानंतर प्रारंभ झाला. नागपूर महानगरपालिकेमध्ये ३०,७८७ आरोग्य सेवकांनी आपले नाव नोंदविले आहे. ज्यांनी पहिली लस घेतली त्यांना दुसरा डोज देण्यात येत आहे.

तसेच फ्रंट लाईन वर्कर यांना सुद्धा कोरोनाची लस देण्यात येत असून यामध्ये २७,५७८ लाभार्थ्यांची नोंद करण्यात आली आहे.