नागपूर : राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरमध्ये १७ मार्चला संध्याकाळी दोन गटात हिंसाचारर [पेटला. दंगलखोरांकडून गल्लीमध्ये घुसून दगडफेक, शिवीगाळ व गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
तरी, सध्याची परिस्थिती पोलिसांच्या नियंत्रणात असून नागपुरात आता तणावपूर्ण शांतता आहे.या दंगलीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज मुधोजीराजे भोसले यांनी भाष्य केले. तसेच पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांच्यावर ताशेरे ओढले.
नागपुरात औरंगजेबाच्या कबरीवरून सकाळी आंदोलन झाले.
यादरम्यान आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. मात्र नंतर आंदोलन शांत झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाला गांभीर्याने घेतले नाही. त्यामुळे दंगल घडल्याचे भोसले म्हणाले.