Published On : Fri, Apr 6th, 2018

आठवा मैल परिसरात शौचाच्या कारणावरून शेजाऱ्याच्या आपसी विवादात युवकाची वृद्धाला मारहाण


वाडी(अंबाझरी): वाडी पोलीस स्टेशन हद्दीतील आठवा मैल परिसरात शेजारी राहणाऱ्या दोन कुटुंबात शौचाला जाण्या सारख्या किरकोळ कारणावरून झालेल्या विवाद व मारहाणीत एका वृद्धाला आपले प्राण गमवावे लागल्याची घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली. वाडी पोलिस व परिसरातून प्राप्त माहिती नुसार मृतकाचे नाव देवराव संभाजी सुरस्कार वय 78 वर्ष असून ते आठवा मैल परिसरातील सिद्धार्थ सोसायटी येथील रहिवाशी होते. तसेच ते आयुध निर्मानी अंबाझरी चे सेवानिवृत्त कर्मचारी ही होते.

आरोपी चंद्रमनी उर्फ चंदू धनराज गजभिये वय 32 वर्ष,त्याचे वडील धनराज गजभिये वय 65 वर्ष शेजारी राहतात, ध नराज गजभिये देखील आयुध निर्मानीतून सेवानिवृत्त झालेले आहेत, बुधवारी रात्री 10.30 च्या सुमारास मृतक सवई प्रमाणे परिसरातील खुल्या मैदानात शौचाला जात होता, त्याच वेळी शेजारील चंद्रमनी गजभिये घराबाहेर जेवण झाल्यावर सहज फिरत होता, त्याने मृतक देवराव याना सहज ओळखीच्या नात्याने उघड्यावर शौचास कशाला जाता, घरी संडास तर आहे? असे टोकले असता मृतकाने चिडून तू कोण होते मला टोकणारा?असे म्हणून प्रतिउत्तर दिले व किरकोळ विवाद करून शौचाला निघून गेला.

दरम्यान चंद्रमनी ने मैदानाच्या दिशेने एक दगड देखील भिरकाविल्याचे समजते.काही वेळानंतर मृतक परत येऊन घरी जात असताना हनुमान मंदिराजवळ मृतक व आरोपी यांची भेट झाली असता मृतकाने पुन्हा तू असे का म्हटले,तू कोण होतोस? असा विवाद सुरू केला त्यामुळे चिडून जाऊन आरोपी चंद्रमनी ने मृतकला लाथा-बुक्यांनी मारहाण सुरू केली,आरडाओरड ऐकून आजु बाजूचे नागरिक धावले व भांडण सोडविले.व दोन्ही कुटुंब आपापल्या घरी निघून गेले.

तक्रारी नुसार मारहाणी मुळे वृद्ध देवराव यांच्या मध्यरात्री पोटात दुखू लागले,गुरुवारी सकाळी ते आठवा मैल येथील एका खाजगी डाॅक्टर कडे जाऊन उपचार करून घरी परतले. दरम्यान गुरुवारी संध्याकाळी मृतकाचा मुलगा सुनील याने वडीलाला मारहाणीची तक्रार वाडी पोलीस स्टेशन ला नोदविल्याने रात्रीच परिसरात जाऊन आरोपी ला व गजभिये कुटुंबियाला समज दिली.

मध्यरात्री मृतकाच्या पोटात पुन्हा दुखू लागले,जवळील ओषधी घेतली पण आराम पडला नाही, मध्यरात्री मूळे ते रुग्णालयात जाऊ शकले नाही,व सकाळी जाऊ असे ठरले. मात्र शुक्रवारी सकाळी 7.30 च्या सुमारास त्यांच्या पोटात जोरात दुखू लागले व अचानक घरीच चक्कर येऊन पडले.व बेशुद्ध झाले व घरीच गतप्राण झाले. या मुळे घरी तीव्र आक्रोश व संताप निर्माण झाला.या घटनेची वाडी पोलिसांना सूचना मिळताच घटनास्थळी पोचून पंचनामा केला व शवाला उत्तरीय तपासणी साठी मेयो ला रवाना केले.मृतकाचा मुलगा सुनील सुरस्कर यांच्या तक्रारीवरून चन्द्रमनी गजभिये यांच्या विरोधात भा.द.वि.304 अंनव्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करून,वरिष्ठ पोलीस निरीक्षक नरेश पवार यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू आहे.