Published On : Tue, Jan 8th, 2019

रामटेक पोलिसांची विशिष्ट कामगिरी;चोरी गेलेल्या गाड्या मध्यप्रदेश येथे जाऊन आणल्या

रामटेक : रामटेक परिसरातील चोरी गेलेल्या गाड्या आज रामटेक पोलिसांनी मध्यपदेश येथे जाऊन चोरी गेलेल्या गाड्याचा शोध घेऊन त्या आणल्या.प्राप्त माहितीनुसार रामटेक व आजू बाजू परिसरात सर्व आरोपी संगमतीने गाड्या चारी करून मध्यप्रदेश येथे घेऊन जात अस व त्याच्या नंबरप्लेट पण बदलत असत, आरोपी मोठ्या प्रमाणात गाड्याची चोरीच्या तक्रारी रामटेक पोलीस स्टेशन ला येत होत्या त्यामुळे पोलिसांनि आप आपल्या मुखबिर च्या माध्यमातून एक विशिष्ठ पथक तयार करून लखनादौंन,मध्यप्रदेश या ठिकाणी गेले असता आरोपी कडे 13 गाड्या अश्या एकूण 4 लाख 13 हजार रु गाड्याची रक्कम जब्त केली असून सर्वआरोपी व 13 गाड्या रामटेक पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले.

सर्व आरोपी यांना 7 तारखेला न्यायायलयात हजर केले व आरोपीना 10 तारखेपर्यंत पोलीस कोठली सुनावली गेली,आरोपीमध्ये गुड्डा उर्फ तुलसी इनवाती वय 32 रा सरस्वा बनकर जी जबलपूर,सौ रेखाबाई उर्फ लक्ष्मी तुलसी इनवाती वय 30 रा सरस्वा बनकर,जिल्हा जबलपूर,मुगला उर्फ कवशल किशोर रामप्रसाद कमरे वय 30 रा अवमेरा आदिगांव, ता लखनादौन,जिल्हा सिवनी ,सतीश उर्फ राजा रजवू शिवकुमार टेकाम वय 19 रा भांडारदेव जिल्हा लखनादौंन,जामसिंग केवलराम पुसाम वय 35 रा सिवनी टोला आदेगाव जिल्हा सिवनी,भुरा उर्फ रातीराम सीताराम काकोडिया वय 35 रा आदेगाव जिल्हा सिवनी,बन्सीलाल उर्फ किशरीलाल कोकोडिया वय 30 रा ठाणा जिल्हा सिवनी सर्व आरोपी यांच्यावर कलम 379 गुन्हा नोंदविला असून असून अजून यांच्याकडून चोरीच्या गाड्या मिळेल असे पी एस आय मृत्योपोड सांगत होते.

हि कार्यव्हावी रामटेक पोलीस ठाणेदार प्रकाश अहाके यांच्या मार्गदर्शनात पी एस आय मृत्योपोड, हेड कॉन्स्टेबल एच सी रावते,एन पी सी ऊकेबोद्रे,पी सी राकेश ,जोषणा,चौधरी चालक गोपीचंद बेंडे यांनी केली. तपास एच सी रावते,गजानन उकिबोद्रे करीत आहे.