Published On : Tue, Jan 8th, 2019

पत्रकारांचा सत्कार करून जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिनाने साजरी

Advertisement

कन्हान : – ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने छोटे खानी कार्यक्रमाचे आयोजन करून पत्रकारांचा सत्कार करून दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती मराठी पत्रकार दिन म्हणुन थाटात साजरी करण्यात आली.

रविवार दि.०६ जानेवारी ला सायंकाळी ८ वाजता स्थानिक डोणेकर सभागृहात जि प नागपुर उपाध्यक्ष मा शरद डोणेकर यांच्या अध्यक्षेत व प्रमुख अतिथी संघाचे जेष्ठ मार्गदर्शक मा एस एन मालविये सर, कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे अध्यक्ष अकरम कुरेशी , ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा मोतीराम रहाटे, नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार, पुष्प अर्पण अभिवादन करण्यात आले .

तद्नंतर स्व पत्रकार प्रा चंद्रकांत जुळे हयाना दोन मिनीट मौनधारण करून श्रध्दाजंली अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात केली. कन्हान येथील विविध वर्तमान वृत्तपत्राच्या पत्रकारांचा ग्रामीण पत्रकार संघ कन्हान, शितला माता मंदीर कमेंटी , नगरसेवक राजेंद्र शेंदरे यांच्या वतीने शाल श्रीफळ, पुष्पगुच्छ व भेट देऊन सत्कार करण्यात आला. पत्रकारांनी सामाजिक, राजकीय व सर्वसामान्याच्या विकासात्मक विविध समस्या सोडविण्याच्या दुष्टीकोनातुन निर्भयपणे दुरदुष्टीने, कुणालाही बळी न पडता पत्रकारिता करण्याचे आवाहन याप्रसंगी जेष्ठ मार्गदर्शक मालविये सर यांनी केले.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन खिमेश बढिये सर यांनी तर आभार संघाचे उपाध्यक्ष सुनिल सरोदे यांनी व्यकत केले . कार्यक्रमास कन्हान-कांद्री दुकानदार महासंघाचे सचिव प्रशांत मसार, केडीके कॉन्व्हेंटचे संचालक अविनाश कांबळे, शितला माता कमेंटीचे वामनराव देशमुख, ग्रा प कांद्री सदस्य चंद्रशेखर बावनकुळे , प्रकाश ढोके , नरेश शेळकी, प्रितेश मेश्राम, रेल्वे युनियन चे श्री बागडे , विदर्भ प्राथमिक संघाचे गणेश खोब्रागडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. पत्रकार एस एन मालविये , मोतीराम रहाटे , रमेश गोळघाटे , कमलसिंह यादव, शांताराम जळते, खिमेश ब़ढिये , सुनील सरोदे , रवींद्र दुपारे , किशोर वासाडे, रोहित मानवटकर, धनंजय कापसीकर, दिनेश नानवटकर, जयंत कुंभलकर आदी पत्रकारांचा सत्कार करण्यात आला .