नागपुर – नरखेड़ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणच्या पथकाने मंगळवारी धाड टाकून जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर या ठिकाणी १५९५०/- रक्कमही पोलिसांना मिळून आली आहे.
जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखा नागपुर ग्रामीणच्या पथकाने छापा टाकून सहा जणांना अटक केली. जुगार प्रतिबंधक कायद्याखाली सशंयितांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार नरखेड येथील शिवारात मंगळवारी संध्याकाळच्या वेळी जुगार सुरू असल्याची तसेच इतर भागातील तरुण त्यामध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखाला मिळाली त्यामुळे हा छापा घालणयात आला .जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा घालताच तेथे जुगार खेळणाऱ्यांची झोप उडाली.त्यात सहा जणांना अटक करून नरखेड पोलिस स्टेशन आणण्यात आले.
अटक करण्यात आलेल्यांची नावे १) रतनलाल संतोष तागडे वय ५१ वर्षे रा. वार्ड क्र. ३ नरखेड २) गजानन गंगाराम ठाकूर ४२ वर्ष रा. नरखेड़ ३) पंकज गुलाबराव चापेकर वय २७ रा. नरखेड ४)विनायक कुंडलिक झाडे वय ३८ रा. नरखेड ५) आकाश रवी रा. नरखेड ६) संदीप बाबुरावजी काळबांडे वय ३८ रा. नरखेड़ असे आहेत.सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक श्री. राकेश ओला, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह )श्री. संजय पुरंदरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. अनिल जिट्टावार यांचे आदेशाने पथकातील सहा. निरीक्षक जितेंद्र वैरागडे, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र गौरखेडे, पोलीस उपनिरीक्षक जावेद शेख ,सहा.उपनि माइकलव ,सहा. उपनि शर्मा ,पोलीस हवालदार राजेंद्र सनोंडीय,पोलीस हवालदार पर्दे,पोलीस हवालदार डोंगरे, भाऊराव यांच्यासह पर पडली.
– दिनेेेश दमाहे (9370868686)