Published On : Wed, May 13th, 2020

कोविड केअर सेंटर संदर्भात भ्रम पसरविणाऱ्या वृत्तांवर जनतेने विश्वास ठेवू नये

Advertisement

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आवाहन

नागपूर : कोरोना विषाणूसंदर्भात भविष्यात उद्‌भवणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करता यावे यासाठी नागपूर महानगरपालिकेने पाच हजार खाटांची क्षमता असलेले “कोव्हिड केअर सेंटर” कळमेश्वर मार्गावरील राधास्वामी सत्संग न्यास परिसरात सुरू केले. सध्या ५०० बेडची व्यवस्था असलेल्या या केंद्रातील बेड एका रात्रीतून गायब झाले या आशयाचे वृत्त एका वृत्तपत्रात प्रकाशित झाले. मात्र हे वृत्त दिशाभूल करणारे असून त्यात काहीही तथ्य नसल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

Gold Rate
15 july 2025
Gold 24 KT 98,200 /-
Gold 22 KT 91,300 /-
Silver/Kg 1,12,500/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

कळमेश्वर मार्गावरील कोव्हिड केअर सेंटर हे सर्वात मोठे केंद्र उभारण्यात नागपूर महानगरपालिकेने महत्त्वाची भूमिका निभावली. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरू असताना नागपुरात घेतलेल्या काही महत्त्वाच्या निर्णयामुळे त्यावर नियंत्रण मिळविता आले आहे. त्याची चर्चा आता होऊ लागली आहे. असे असतानाही भविष्यात कुठल्या गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागल्यास संपूर्ण तयारी असावी यासाठी राधास्वामी सत्संग न्यासच्या सहकार्याने नागपुरात पाच हजार बेड क्षमता असलेल्या कोव्हिड केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली. याची वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक मीडियानेही दखल घेतली. सदर केंद्रात सध्या ५०० बेड ठेवण्यात आले असून वेगवेगळे कम्पार्टमेंट करण्यात आले आहेत. आवश्यकतेनुसार त्या कम्पार्टमेंटमध्ये बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ ५०० बेडसाठी आवश्यक कम्पार्टमेंटमध्ये बेड आहेत. शिवाय इतके मोठे केंद्र उभारताना सर्वच तांत्रिक बाबी तपासण्यात आल्या आहेत. वायुविजन, वीज, पाणी या सर्वच बाबींची व्यवस्था करण्यात आली आहे.

एका वर्तमानपत्राने ज्या कम्पार्टमेंटमध्ये बेड नाहीत, त्या कम्पार्टमेंटचे छायाचित्र काढून प्रकाशित केले. अशा आपतकालिन परिस्थितीत असे दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित करून जनतेमध्ये भ्रम आणि गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे संपूर्ण वृत्त वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे आहे. नागपूर महानगरपालिका कोव्हिड-१९ ची साखळी खंडित करण्यासाठी आणि येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करीत आहे. जनतेने अशा दिशाभूल करणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

Advertisement
Advertisement