Published On : Fri, Jul 5th, 2019

रामटेक नगरपरिषदेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

नगराध्यक्ष दिलीप देशमुख व नगरसेवक -नागरसेविकानी केले वृक्षारोपण,रामटेक नगरीत लागणार 1700 वृक्ष

रामटेक: महाराष्ट्र शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमा अंतर्गत रामटेक नगर परिषदेच्या वतीने शहरात ठिकठिकाणी पर्यावरणास उपयुक्त व पुरक अशा 1700 वृक्षारोपट्यांचे रोपण करण्यात येणार आहे.रोपांचे संवर्धन व संगोपनासाठी सेल्फ वाटरिंग ट्री गार्ड या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करन्यात येणार आहे. या वृक्षारोपण कार्यक्रमाची सुरुवात नेहरू मैदानावर नगराध्यक्ष दिलीप देशमुख यांच्या हस्ते झाली.

यावेळी त्यांनी रामटेक शहरात होणाऱ्या वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन कार्यक्रमात नागरिकांनी मोठया संख्येने भाग घेऊन शहर हिरवेगार करावे असे आवाहन यावेळी केले.

या कार्यक्रमाला नगर परिषद उपाध्यक्ष शिल्पा रणदिवे,नगरसेविका पदमा ठेंगरे,कविता मुलमुले,वनमाला चौरागडे,नगरसेवक आलोक मानकर,प्रभाकर खेडकर तसेच पदाधिकारी व कर्मचारी वर्ग प्रामुख्याने उपस्थित होते.
Attachments area