Published On : Fri, Jul 5th, 2019

सलग चौथ्या दिवशी नासुप्र’ची अतिक्रमण कारवाई

श्री राम सेलिब्रेशन’चे हटविले अनधिकृत बांधकाम

नागपूर: सलग चार दिवस अनधिकृत बांधकामावर कारवाई करून आज गुरवार, दिनांक ०४ जुलै २०१९ रोजी नासुप्र’ने श्री राम सेलिब्रेशन’चे अवैध बांधकाम हटविले. टिप्पर व जेसीबी’च्या साह्याने सदर कारवाई करण्यात आली.

मानेवाडा स्थित लाडीकर लेआऊट नागरिक विकास समिती मधील भूखंड क्रमांक १५,१६,१७,१८ (पार्ट) या भूखंडावर बांधण्यात आलेले श्री राम सेलिब्रेशन व्यावसायिक उद्देशाने वापरण्यात येत होते. भूखंडधारकाने उक्त सभागृहाचा बांधकाम नकाशा मंजूर न करून घेतल्याने ३ जून ते ५ जून दरम्यान याठिकाणी नासुप्र’तर्फे अतिक्रमण हटविण्यात आले होते.

तर उर्वरित अनधिकृत बांधकाम काढण्यासाठी सदर नासुप्र’तर्फे करण्यात आली. सदर कारवाई यशस्वीरीत्या पूर्ण करण्यासाठी नासुप्र’च्या दक्षिण विभागातील कार्यकारी अभियंता श्री. संजय चिमुरकर, विभागीय अधिकारी श्री. अनिल राठोड, सहाय्यक अभियंता श्रेणी-२ श्री संदीप राऊत, क्षतिपथक प्रमुख श्री. मनोहर पाटील तसेच हुडकेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.