नागपूर : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता उद्या जाहीर होणार्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याआधीच राजकीय वर्तुळात मुख्यमंत्री पदासाठी पोस्टरबाजी सुरु झाली आहे. बारामतीमध्ये अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर लागले आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी लागलेल्या पोस्टरमध्ये सलग आठव्यांदा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल अजित पवारांच अभिनंदन असा मजकूर पोस्टरमध्ये आहे. महायुतीमध्ये या पोस्टरची चर्चा सुरु झाली आहे.अजित पवार गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदासाठी निकाल येण्याआधीच लॉबिंग सुरु केल्याचे दिसते. पर्वती विधानसभा क्षेत्र आणि बारामतीमध्ये प्रशांत शरद बारवकर मित्र परिवाराने हे बॅनर लावले आहेत. यात मतमोजणीआधीच मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्याबद्दल अजित पवारांना शुभेच्छा दिल्या आहेत. रस्त्यावर लागलेल्या या पोस्टर्सची राजकीय चर्चा सुरु झाली आहे.








