Published On : Tue, Jan 28th, 2020

चारगांव-कांद्री मार्गाची दुर्दशा* रस्त्यावर जागोजागी खड्डेच खड्डे

रामटेक:-तालुक्यातील अत्यंत रहदारीचा मार्ग असलेल्या चारगांव ते कांद्री मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या रखडलेल्या कामामुळे रस्त्यावर खड्यांचे साम्राज्य झाले आहे.

चारगांव कांद्री मार्गावर रस्त्याच्या खडीकरणाचे काम मागील काही दिवसापासून सुरू असून रस्त्यावर ठिकठिकाणी गिट्टी टाकलेली आहे. काम पुर्ण न झाल्याने मध्ये मध्ये टाकलेली गिट्टी उखडलेली असून जागोजागी खड्डे पडलेली आहेत. या मार्गावरून शाळेत व महाविद्यालयात शिकणार्‍या विद्यार्थ्यांसह कार्यालयीन नोकरी करणारे कर्मचारी व परिसरातील शेतकर्‍यांची सततची ये जा सुरू असते.

या मार्गावर टाकण्यांत आलेल्या गिट्टीच्या चुरीमुळे वाहने घसरून अपघात होत अाहेत.व मार्गावर मार्गक्रमण करणे कठीण होत आहे.रस्त्याचे बांधकाम त्वरीत पुर्ण व्हावे.व वाहनधारकांना दिलासा मिळावा अशी प्रतिक्रिया उमटत आहे.लोकप्रतिनिधींनी या कामाकडे त्वरीत लक्ष घालून रस्ता बांधकाम लवकरात लवकर पुर्ण व्हावी अशी मागणी नागरिकांची आहे.