Published On : Wed, Sep 22nd, 2021

पीपल्स रिपब्लिकन पार्टी करणार ‘युवा चेतना दिन’ साजरा

– कार्याध्यक्ष जयदीप कवाडेंच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

नागपूर – पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, युवा भीम सैनिकांचे हृदय सम्राट, तरूण नेतृत्व भाई जयदिपजी कवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या, गुरूवारी २३ स्पटेंबरला ‘युवा चेतना दिन’ साजरा केला जाणार आहे. ‘युवा चेतना दिन’निमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड,दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदुर सेना, राष्ट्रीय विद्यार्थी सेने तर्फे शहरातील विविध अनाथालय, रुग्णालयात फळवाटप कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय सर्व विधानसभा मतदार संघात रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आल्याची माहिती पीरिपा प्रदेश संघटक कपील लिंगायत यांनी दिली.

आनंद नगरात मुख्य सोहळा
देशातील आंबेडकरी, बहुजन, अल्पसंख्याक, आदिवासी, वंचित घटकातील युवकांमध्ये संघर्षरुपी स्फूर्ती व एकजुटीची भावना निर्माण करून त्यांना संविधानाच्या संरक्षणार्थ लढण्यास प्रेरित करणार्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे लाडके युवा नेते भाई जयदीप जोगेंद्र कवाडे हे 38 व्या वर्षात पदापर्ण करणार आहेत. देशभरात पीरिपा ‘युवा चेतना दिन’ म्हणून साजरा करणार असल्याचेही लिंगायत म्हणाले. नागपुरातील आनंद नगरातील पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या मुख्य कार्यालयात गुरूवारी सायंकाळी ५ वाजता भव्य सत्कार सोहळयाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे विदर्भ व जिल्हयातील कार्यकर्ते उपस्थित राहतील. कार्यक्रमाच्या यषस्वीतेसाठी ताराचंद्र खांडेकर, ई.मो.नारनवरे,सौ.रंजना कवाडे, अरुण गजभिये, बालू मामा कोसमकर, नरेंद्र डोंगरे, भगवानदास भोजवानी, अजय चव्हाण, कैलास बोंबले, संजय खांडेकर, गौतम गेडाम, प्रकाश मेश्राम, सौ. प्रतिमा ज. कवाडे, सविताताई नारनवरे, पूनम मटके, शीतल खान, अॅड. अरुण महाकाळे, विपीन गाडगीलवार, तुषार चिकाटे, रोशन तेलरांधे, पियुष हलमारे, सुरेश बोनदाडे, गौतम थुलकर, कुशीनारा सोमकुवर, वसीम खान, प्रज्योत कांबळे प्रयत्नरत आहेत.