Published On : Sat, Jan 13th, 2018

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हेच मनपाच्या शिक्षण विभागाचे ध्येय : दीपराज पार्डीकर

Advertisement

नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, त्यांना क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात मोठे करावे, हेच आमचे ध्येय आहे, असे प्रतिपादन उपमहापौर दीपराज पार्डकर यांनी केले. शनिवार (ता.१३) यशवंत स्टेडियम येथे आयोजित शिक्षण सप्ताहाच्या समारोपाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, उपसभापती प्रमोद तभाने, धरमपेठ झोनच्या सभापती रूपा राय, उपायुक्त रवींद्र देवतळे, शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना पार्डीकर म्हणाले, मनपाच्या शाळेतील विद्यार्थी हे गरीब घरातील असून, त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासनाने आणलेल्या नवीन योजना ह्या मनपाच्यावतीने राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळामध्ये अथवा सांस्कृतिक स्पर्धेमध्ये उतरविण्याच्या दृष्टीने प्रयत्न शिक्षण विभागाद्वारे करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांमधील गुण हेरून त्यांना त्यापद्धतीने प्रशिक्षण देण्यासाठी महानगरपालिका कटीबद्ध आहे. शिक्षण विभागाला व क्रीडा विभागाला कोणतीही मदत लागली तर मी सदैव त्यांच्या पाठिशी आहे, असे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले.

शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे यांनी शिक्षण सप्ताहांतर्गत आयोजित क्रीडा स्पर्धांमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करीत त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेच्या दृष्टीने प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्या प्रशिक्षणासाठी लागेल तो खर्च महानगरपालिका करेल, अशी घोषणा त्यांनी यावेळी केली. मनपाच्या विद्यार्थ्यांचे क्रीडा व सांस्कृतिक क्षेत्रातील योगदान हे लक्षणीय असून त्या सर्व विद्यार्थ्यांचे मी अभिनंदन करतो, असेही ते म्हणाले.

क्रीडा समिती सभापती नागेश सहारे म्हणाले, विद्यार्थ्यांना पुढील स्पर्धेकरिता कसे तयार करता येईल याकडे शिक्षकांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. त्यांना राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय स्पर्धेकरीता तयार करण्यासाठी मनपा विशेष प्रयत्न करेल, असे आश्वासन त्यांनी दिले.

प्रारंभी मान्यवरांचे स्वागत शिक्षणाधिकारी संध्या मेडपल्लीवार यांनी केले. स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाली. पारडी उच्च मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी कोळी नृत्य सादर केले. सुरेंद्रगड हिंदी माध्यामिक शाळेच्या विद्यार्थ्यांनी लावणी नृत्य सादर केले.

विद्यार्थ्यांमध्ये सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्राची आवड निर्माण व्हावी याकरिता शिक्षण सप्ताहाचे आयोजन मनपाद्वारे दरवर्षी करण्यात येते. त्यात मैदानी खेळाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती शिक्षणाधिकारी मेडपल्लीवार यांनी प्रास्ताविकातून दिली. यावेळी विविध स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले.

कार्यक्रमाला क्रीडा निरीक्षक नरेश चौधऱी, क्रीडा विभाग प्रमुख नरेश सवाईथूल, जितेंद्र गायकवाड, मुख्याधापक संजय पुंड, सर्व शाळा निरिक्षक , मनपा शाळेच्या शिक्षिका व शिक्षक उपस्थित