Published On : Sat, Sep 9th, 2023

विरोधकांच्या ‘इंडिया’ आघाडीला २०२३ च्या पोटनिवडणुकीत सर्वाधिक जागा तर भाजपला केवळ ३ जागा !

Advertisement

नागपूर : मोदी सरकारच्या विरोधात सर्व विरोधकांनी एकत्रित येत मोट बांधली आहे. यातच विरोधकांनी आपल्या आघाडीला इंडिया (I.N.D.I.A) असे नाव दिले होते. येत्या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. नुकतेच केलेल्या सर्वेक्षणात देशात झालेल्या पोटनिवडणुकीत इंडिया आघाडीला यश मिळाले आहे. सात पैकी चार जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. भाजपला तीन जागांवर समाधान मानावे लागले.

उत्तर प्रदेशची जागा भाजपला जिंकण्यात अपयश आले आहे. पश्चिम बंगालमध्ये ‘इंडिया’तील घटक पक्ष वेगवेगळे लढूनही तृणमूल काँग्रेसने भाजपच्या उमेदवाराला पराभूत केले.

Advertisement

केरळमध्ये भाजप स्पर्धक नसल्याने काँग्रेस व ‘माकप’ एकमेकांविरोधात मैदानात उतरले.

देशातील सहा राज्यातील सात विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला. यामध्ये त्रिपुरामधील दोन आणि उत्तराखंडमधील एका जागेवर भाजपला विजय मिळवण्यात यश आले आहे. केरळमधील पुथुप्पली येथे काँग्रेसच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल कांग्रेसने बाजी मारली आहे. झारखंडमध्ये I.N.D.I.A आघाडीकडून JMM ने विजय मिळवला आहे. उत्तरप्रदेशमधील घोसी येथील जागेवर समाजवादी पार्टीच्या सुधारक सिंह यांनी विजय मिळवला आहे. सहा राज्यातील सात जागांवर 5 सप्टेंबर रोजी मतदान झाले होते. त्यामध्ये पाच जागांवर घोसी (यूपी), बागेश्वर (उत्तराखंड), डुमरी (झारखंड), बॉक्सानगर आणि धनपुर (त्रिपुरा) येथे इंडिया आघाडीने एकत्र निवडणूक लढवली होती.

पोटनिवडणुकीचा निकाल खालीलप्रमाणे –