Published On : Fri, Nov 5th, 2021
Latest News | By Nagpur Today Nagpur News

शहरातील वाहतूक समस्यांवर एकमेव उपाय – मेट्रो

सिताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशन

नागपूर: नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या अॅ क्वा आणि ऑरेंज लाईनवरील २४ मेट्रो स्थानकांवरून प्रवासी सेवा सुरू झालेली आहे. जागतिक दर्जाच्या, सोयीस्कर मेट्रो वाहतूक व्यवस्थेकडे नागरिकांचा कल सातत्याने वाढत आहे. त्यामुळे दोन्ही मार्गावरील प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. पर्यावरणपूरक, आरामदायक वाहतूक सेवा असण्याव्यतिरिक्त प्रवाश्यांच्या दृष्टीने मेट्रोचा प्रवास सुरक्षित आणि आर्थिकरित्या परवडण्यासारखा आहे. मेट्रोच्या प्रवासी सेवा सकाळी ६.३० ते रात्री ९ पर्यंत प्रत्येक १५ – १५ मिनिटांच्या अंतराने अविरत सुरू आहेत. स्टेशन ते गंतव्यस्थानापर्यंत फीडर सेवेची सोय करण्यात आली आहे. सिटी बस फीडर सेवे व्यतिरिक्त प्रवाशांना कमी दरात ई-रिक्षा, ई-सायकल, ई-बाईकची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोतर्फे मोबाईल अँप देखील उपलब्ध आहे. मेट्रो तिकिटांसाठी रांगेत उभे राहण्याच्या अडचणींपासून दूर या अँपवर QR कोड च्या माध्यमाने तिकीट बुक करता येते. महामेट्रोकडून सवलतीच्या दरात महाकार्ड सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

• मेट्रो रेल्वेची वाहतूक व्यवस्था नागरिकांच्या सोयीसाठी निर्माण करण्यात आली आहे.
• नागरिकांनी वाहतुकीसाठी जास्तीत जास्त मेट्रोचा वापर करावा जेणेकरून शहराचे वातावरण प्रदूषित होणार नाही.
• मेट्रोच्या वापरामुळे इंधन आणि ऊर्जेची बचत होईल.
• मेट्रोच्या अधिक वापरामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल आणि शहराचे वातावरण निरोगी राहील.
• मेट्रोची वाहतूक सेवा लोकाभिमुख करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचे सहकार्य आवश्यक आहे
• मेट्रो ट्रेनच्या आगमनाने शहराची जीवनशैली बदलते आहे. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी मेट्रोने प्रवास करून, एकीकडे वेळ आणि इंधनाची बचत करत असताना, दुसरीकडे वाहतूक


कोंडीच्या जाचापासून मुक्त होत आहेत. त्याचबरोबर पगारदारांचा मेट्रोकडे कल वाढत आहे. मेट्रो ट्रेनमध्ये सायकल नेण्याची सवलत दिल्याने याचा फायदा विशेषतः सायकलपटू आणि विद्यार्थी घेत आहेत.

  • डॉ. ब्रिजेश दीक्षित व्यवस्थापकीय संचालक, महा मेट्रो

नागपुरातील मेट्रो प्रकल्प म्हणजे येथील वाहतूक समस्येवर तोडगा आहे. सुरक्षित, आरामदायक वाहतूक व्यवस्था निर्माण करण्यासोबतच पर्यावरणाचे संवर्धन करण्याचे कार्य मेट्रोच्या निमित्ताने होते. या सर्व बाबींचा विचार करत सर्वांनी मेट्रोचा वापर हीच काळाची गरज आहे.

 

  • मेट्रो स्थानक आहेत प्रेक्षणीयस्थळ – प्रकल्पाच्या उभारणी अंतर्गत महा मेट्रोने बांधकाम केलेले स्थानक विविध थीमवर निर्मित आहेत. या स्थानकांचे एकूणच स्थापत्य व बांधकामाचा आढावा घेतला तर हि स्थानके प्रेक्षणीय स्थळाच्या दर्जाची आहेत. खापरी मेट्रो स्टेशनचे व्हिक्टोरियन शैलीत बांधकाम किंवा, सांची येथील स्तूपाची प्रतिकृती असलेले न्यू एयरपोर्ट स्टेशन, जंगल थीमवर आधारित जय प्रकाश नगर स्टेशन, झाशी राणीचे म्युरल असलेले झाशी राणी चौक स्टेशन – असे मेट्रो स्थानके शहरकरता प्रेक्षणीय स्थळे आहेत. कस्तुरचंद पार्क स्टेशनचे बांधकाम आणि स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी म्हणजे ७५ व्या वर्षानिमित्त झिरो माईल स्टेशन येथील निर्माण केलेले फ्रिडम पार्क याच शृंखलेचा भाग आहेत.

 

फ्रीडम पार्कमध्ये निर्माण करण्यात आलेल्या ऐतिहासिक सौन्दर्यास पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. आकर्षक कारंज्याजवळ मेट्रो ट्रेनच्या डब्याची प्रतिकृती बसवण्यात आली आहे. हे आबालवृद्धांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. मेट्रो रेल्वेशी संबंधित सविस्तर माहिती देण्यासाठी या डब्यात एक माहिती केंद्र उभारण्यात आले आहे. झिरो माइल फ्रीडम पार्क स्टेशनची भव्यता आणि सौंदर्य पादचाऱ्यांना काही क्षण थांबण्यास भाग पाडते. कस्तुरचंद पार्क परिसर हा शहराचा ऐतिहासिक वारसा आहे. याचे संवर्धन करून, महामेट्रोने ते नव्या शैलीत जपण्याची भूमिका स्वीकारली आहे. छत्रपती नगर आणि झाशी राणी मेट्रो स्टेशनच्या बांधकामात ऐतिहासिक महत्त्व देण्यात आले आहे.

 

वर्षाखेर चारही दिशांना मेट्रो …
सध्या कस्तूरचंद पार्क मेट्रो स्टेशन ते खापरी मेट्रो स्टेशन (ऑरेंज लाइन) दरम्यान मेट्रो रेल्वे धावत आहे. तसेच सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्यनगर मेट्रो स्टेशन (एक्वा लाईन) दरम्यान मेट्रोचे प्रवासी सेवा सुरु आहे. मेट्रो रेल्वे सेवा दोन्ही बाजूंनी ऑरेंज लाईनवर सकाळी ७.३० ते रात्री ८.३० आणि एक्वा लाईनवर सकाळी ६.३० ते ९.३० दर १५ मिनिटांनी उपलब्ध आहे. ऑरेंज लाईनच्या रिच-२ कस्तुरचंद पार्क ते कामठी मार्गावरील ऑटोमोटिव्ह चौक आणि एक्वा लाईनच्या रिच-४ च्या प्रजापती नगर (जुना पार्डी नाका चौक) पर्यंत मेट्रो रेल्वे सेवा डिसेंबर अखेरपर्यंत सुरू करण्याचे प्रयत्न आहेत.

 

व्यावसायिक निमित्ताने मार्केट उपलब्ध
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या माध्यमातून वाहतुकीचे साधन उपलब्ध करून देण्याबरोबरच व्यावसायिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जात आहे. बहुतेक मेट्रो स्थानकांवर व्यवसायासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. इलेक्ट्रॉनिक मार्केटसाठी दुकाने झिरो माइल फ्रीडम पार्क स्टेशनवर बांधण्यात आली आहेत. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सीताबर्डी इंटरचेंज स्थानकाजवळील बहुमजली इमारतीत पार्किंगची व्यवस्था करण्यासाठी पीपीपी पद्धतीने तरतूद केली जात आहे. येत्या काळात रहिवाशांना चांगली सुविधा उपलब्ध होणार आहे.

 

झिरो माईल फिडम पार्क मेट्रो स्टेशन :
येथील २० मजल्यांपैकी २ मजले पार्किंगसाठी आणि उर्वरित १८ मजले इतर विविध व्यावसायिक कारणांसाठी वापरण्यात येणार आहेत. महा मेट्रोच्या पार्किंग आणि व्यावसायिक बांधकाम धोरणांतर्गत हे बांधकाम पीपीपी मॉडेलवर आधारित असेल. जो कंत्राटदार ही इमारत बांधणार आहे त्याने स्टेशनच्यावर २९,००० चौरस फूट बांधकाम करावे. या इमारतीमध्ये पार्किंगसाठी बांधण्यात येत असलेल्या २ भुयारी मजल्यांव्यतिरिक्त, २ मजले – तळमजला आणि मेझानाइन फ्लोअरचा वापर पार्किंगसाठी केला जाणार आहे.

 

इलेक्ट्रॉनिक मार्केट-
या स्थानकावर मिनी इलेक्ट्रॉनिक मार्केट प्रस्तावित असून या स्थानकावर एकूण २० दुकाने बांधण्यात आली आहेत. या अंतर्गत जागा ९ वर्षांच्या कालावधीसाठी भाड्याने दिली जाऊ शकते. एकूण २० दुकानांपैकी १७ दुकानांचे क्षेत्रफळ १२५ ते १५० चौरस फूट आहे. उर्वरित ३ दुकाने ६०० ते ९०० चौरस फूट क्षेत्रासह आकाराने मोठी आहेत. यासोबतच स्टेशनच्या काँकोर्स परिसरात तिकीट आणि चिल्लर विक्रीची दुकाने असतील. संबंधित कंत्राटदार या इमारतीत हॉटेल, बँक्वेट हॉल, कार्यालय आणि इतर बांधकाम कामे करू शकतो.

ऑरेंज लाईन

सकाळी ७. ३० ते रात्री ९ वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपल्बध

अँक्वा लाईन

सकाळी ६. ३० ते रात्री ९ वाजता पर्यंत दर १५ मिनिटांनी मेट्रो सेवा उपल्बध

१. खापरी

२. न्यू एअरपोर्ट

३. एअरपोर्ट साऊ

४. एअरपोर्ट

५. उज्ज्वल नगर

६. जय प्रकाश नगर

७. छत्रपती चौक

८. अजनी चौक

९. रहाटे कॉलोनी

१०. काँग्रेस नगर

११. सिताबर्डी इंटरचेंज

१२. झिरो माईल फ्रिडम पार्क

१३. कस्तुरचंद पार्क

 

१. लोकमान्य नगर

२. बंसी नगर

३. वासुदेव नगर

४. रचना रिंग रोड जंव्कशन

५. सुभाष नगर

६. धरमपेठ कॉलेज

७. एलएडी चौक

८. शंकर नगर चौक

९. इंस्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स

१०. झाशी राणी चौक

११. सिताबर्डी इंटरचेंज