Published On : Fri, Oct 2nd, 2020

स्मार्ट सिटीचा एकच ध्यास लहान -मोठ्यांना घेता यावा मोकळा श्वास

गांधी जयंती निमित्त सीताबर्डी मध्ये ‘ओपन स्ट्रीट’ व्हेहीकल फ्री जोन’ बददल जनजागृती

नागपूर : नागपूर स्मार्ट अड सस्टेनेबल सिटी डेवल्पमेंट कारपोरेशन लिमिटेउच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या १५१ व्या जयंती निमित्त सीताबर्डी बाजारपेठ पायी चालून आणि सायकलिंगच्या माध्यमाने ‘ओपन स्ट्रीट’ व्हेहीकल फ्री जोन’ बददल जनजागृती करण्यात आली. या कार्यक्रमात ई-पाठशाला शाळेचे शिक्षक सहभागी झाले. स्मार्ट सिटीच्या माध्यमाने गांधीजींची १५१ व्या जयंती निमित्त दोन वर्षापासून सुरु असलेल्या कार्यक्रमाचा समारोप आज शुक्रवारी (दि.२ ऑक्टोंबर २०) रोजी करण्यात आला.

केन्र्ा शासनाने गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयाचे वतीने स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत प्रदूषण रहीत वाहने आणि पायी चालणा-यांना प्राधान्य दिल्या गेले आहे. देशात राष्ट्रपिता गांधी यांची जयंती प्रित्यर्थ सर्वप्रथम व्हेरायटी चौक मध्ये गांधीजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उददेश नागरिकांमध्ये जनजागृती करणे आहे. स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.महेश मोरोणे, ई-पाठशाला सीबीएसई शाळेचे प्रबंध निदेशक सतीश कुंदनवार, मुख्य अध्यापक अनघा परसोडकर, स्वप्ना मेश्राम, उपप्राचार्य श्रीमती ज्योती, केतन जोशी, फन प्लेनेटचे जीतू गोपलानी, श्रीमती पुनम गोपलानी आदी प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य शासनाचे दिशा निर्देशांचे व सोशल डिस्टेसिंगचे पालन करुन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

स्मार्ट सिटी अधिकारी आणि ई-पाठशाला चे शिक्षक पारंपारिक वेशभूषेत कार्यक्रमात सहभागी झाले होते. भारत माता की जय, राष्ट्रपिता महात्मा गांधी अमर रहें, स्मार्ट सिटीचा एकच ध्यास, आजी – आजोबांना मोकळा श्वास, स्मार्ट सिटी बनाने का है इरादा, प्रदूषण मुक्त पर्यावरण का है वादा, होऊ सगळे सायकलस्वार स्मार्ट सिटीच्या उदयाला खरा आधार असे बॅनर हातात घेऊन आणि नारे देत त्यांनी सीताबर्डी बाजारपेठेत जनजागृती केली. नागरिकांनीही त्यांना चांगला प्रतिसाद दिला.

यावेळेस सीईओ श्री. महेश मोरोणे यांनी सांगितले की, स्मार्ट सिटीज मिशन अंतर्गत नागपूर शहरात ‘इंडिया सायकल्स फार चेंज’ कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. हा कार्यक्रम तीन टप्प्यात राबविण्यात येणार आहे. प्रथम चरणामध्ये नागपूरात लहान – लहान उपाय करुन सायकलिंग ला प्रोत्साहन देण्याचे प्रयत्न केले जात आहे. नागपूरात सायकल चालविण्यायोग्य १८ किमी रस्त्यांवरती ‘डेडीकेटेड बायसिकल लेन’ तयार करण्यात येणार आहे. सीताबर्डी नागपूराची प्रमुख बाजारपेठ आहे. या बाजारपेठेला व्हेईकल फ्री करण्याकरीता सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांनी व दूकानदारांनी याला चांगला प्रतिसाद दिला. पोलिसांनीपण याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पुढच्या आठवडयात हा प्रस्ताव मनपा आयुक्त श्री. राधाकृष्णन बी. यांचेकडे परवानगीसाठी पाठविला जाईल, असेही ते म्हणाले.

या कार्यक्रमात स्मार्ट सिटीचे अधिकारी डॉ.शील घुले, श्रीमती नेहा झा, डॉ. प्रणीता उमरेडकर, राहुल पांडे, अमित शिरपुरकर, मनीष सोनी, अमृता देशकर, अनूप लाहोटी, डॉ. पराग अरमल, श्रीमती उजवने, अपुर्वा फडणवीस यांनी सहभाग घेतला.