मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कार्यालय बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे कार्यालय पुन्हा सुरु

Advertisement

नागपूर: विदर्भातील दुर्धर आजाराच्या गरीब रुग्णांसाठी नागपुरात हैद्राबाद हाऊस येथील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यालय माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पाठपुराव्यामुळे सुरु झाले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी हे कार्यालय सुरु करण्याचे निर्देश दोन दिवसांपूर्वीच दिले आहेत.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक निर्णयामुळे व माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या प्रयत्नांनी सुरु झालेले मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे कार्यालय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर बंद करण्यात आले होते. यामुळे विदर्भातील हजारो दुर्धर आजाराच्या गरीब रुग्णांना उपचार मिळेनासे झाले होते. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी त्यांना मुंबईत मंत्रालयात चकरा घालाव्या लागत होत्या.

ही बाब लक्षात घेऊन माजी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र पाठवून हे कार्यालय नागपुरात सुरु करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल शासनाने लगेच घेऊन हे कार्यालय सुरु केले.

इंदिरा गांधी शासकीय महाविद्यालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सोनपुरे हे काम पाहतील. त्यांना सहाय्य करण्यासाठी एक लिपिकही देण्यात आला आहे. या कक्षासाठी विभागीय आयुक्त, उपसंचालक आरोग्य सेवा आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांची समिती देखील स्थापन करण्यात आली आहे.

या कक्षात गरीब रुग्णांचे अर्ज स्वीकारले जातील आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातून त्यांना मदत करण्यात येईल. या कक्षाचे कामकाज तात्काळ सुरु करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले