Published On : Fri, Nov 24th, 2017

नासुप्र सभापती यांनी विविध प्रकल्पांची पाहणी केली


नागपूर : नागपूर महानगर पालिका द्वारा मौजा. भांडेवाडी येथे संपूर्ण नागपूर शहराच्या मलनिस्सरणा-साठी मोठ्या क्षमतेचे मलनिस्सरण केंद्र उभारण्यात आले आहे. मात्र मागील १५ वर्षात नागपूर शहराच्या विविध कोपऱ्यात मोठ्या प्रमाणात लोकवस्त्या निर्माण झाल्या आहेत.

अ.) मलनिस्सरण केंद्राची (Sewage Treatment Plant) पाहणी .

भांडेवाडी येथे या लोकवस्त्यांतील सिवेज पोहचविणे हे या वस्त्यांना जोडणाऱ्या मुख्य मल वाहिन्या (Main Intercepting Lines) नसल्यामुळे शक्य झाले नाही. मग जागोजागी Septic Tank बांधण्यात आले किंवा कुठलीही प्रक्रिया न करता लोकवस्तितील Sewage सरळ लगतच्या नदी नाल्यामध्ये सोडण्यात आले.

Advertisement

लोकवस्तीमधील वाढ व पर्यायाने या कुठलीही प्रक्रिया न केलेल्या सिवेज मधिल वाढ या मुळे नदी/नाले/तलाव प्रदुषित होत गेले. गोरेवाडा तलाव जो नागपूर शहराच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोतांपैकी एक आहे तो सुद्धा प्रदूषित झाला असल्याचे लक्षात येते.

या सर्व बाबींचा विचार करता मौजा: भांडेवाडी येथील मल निस्सरण केंद्राची क्षमता भविष्यात कमी पडणार हे लक्षात घेता. शिवाय केन्द्रीय व्यवस्था (Centralized System) असून त्याचे विकेंद्रीकरण (De-Centralization) करणे काळाची गरज आहे. नाग नदी/उपनद्यांच्या आणि इतर नद्यांच्या प्रदूषणामुळे गोसीखुर्द प्रकल्पांचे पाणी दुषित होत असल्याने तत्काळ उपाय योजना कराव्या यासाठी मा.उच्च न्यायालयात दाखल जनहित याचिका क्रमांक ३८/२०१० मधील मा.उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये व सामाजिक दायित्व लक्षात घेऊन नागपूर सुधार प्रन्यास तर्फे नागपूर शहराच्या उत्तर –दक्षिण,पूर्व-पश्चिम या भागात त्या त्या भागाचा अभ्यास करून विविध क्षमतेचे मल निस्सरण केंद्र उभारण्यात येत आहे.

यांच अनुषंगाने नासुप्र सभापती डॉ.दीपक म्हैसेकर यांनी मौजा.सोमलवाडा येथे नासुप्र द्वारे बांधण्यात येत असलेल्या मलनिस्सरण केंद्राची (Sewage Treatment Plant) पाहणी केली,तसेच मलनिस्सरण केंद्राचे पाणी (Recycle) पुन:वापरुन रिसायकल केलेले पाणी स्टोरेज करून कश्या प्रकारे थेट एम.आय.डी.सी.अश्या औद्योगिक वसाहतीला देता येईल, याबदल आराखडा तयार करण्याच्या सुचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या


ब.) नासुप्र द्वारे बाधण्यात येत असलेल्या घरकुल योजनेची पाहणी

नासुप्र द्वारे मौजा. वाठोडा,शेष नगर येथे अल्प उत्पन्न गटाकरिता बांधण्यात येत असलेल्या(Affordable Housing) ४६८ गाळ्यांच्या घरुकुल योजनेची पाहणी नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केली. या बहुमजली इमारतीचे बांधकाम करताना सुरक्षतेच्या दृष्टीने कामगार व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षतेबाबत व्यवस्था करण्याबाबत कंत्राटदाराला निर्देश देण्यात आले, तसेच निर्माणाधीन इमारतीमधे तयार करण्यात आलेल्या नमुना फ्लॅट (Sample Flat) ची पाहणी करून, कामाची गती वाढवून हे गाळे लवकरात लवकर नागरिकांना उपलब्ध करून देण्याबाबतच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात.

क.) लकडगंज पोलीस स्टेशन परिसरातील पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचाऱ्यांनकरिता निर्माणाधीन निवासी गाळ्यांची पाहणी

नासुप्र द्वारे बांधण्यात येत असलेल्या लकडगंज पोलीस स्टेशन परिसरात पोलीस स्टेशन व पोलीस कर्मचाऱ्यांकरिता ३४८ निवासी गाळ्यांच्या निर्माणाधीन कार्याची नासुप्र सभापती यांनी आज पाहणी केली. या ठिकाणी तळ मजला + ११ मंजली इमारतीच्या निर्माण कार्याला सुरवात झाली असून फाउंडेशन च्या कामांची पाहणी आज नासुप्र सभापती यांनी केली. सुरु असलेले कार्य योग्यपूर्ण नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावे अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्यात. या ठिकाणी सहाय्यक पोलीस कमिशनर,पोलिस उपनिरीक्षक कार्यालय तसेच सामाजिक सभागृह व ओपन स्पेस चा समावेश या ठिकाणी करण्यात आला आहे.

Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement

Advertisement
Advertisement

 

Advertisement
Advertisement
Advertisement