Published On : Fri, May 8th, 2020

मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी – शरद पवार

Advertisement

कोरोना काळातील या अपघाताने शरद पवारांच्या मनाला यातना.

मुंबई : औरंगाबादजवळील करमाड रेल्वे दुर्घटनेत मजुरांच्या दुर्दैवी मृत्यूची बातमी अतिशय व्यथित करणारी होतीच शिवाय कोरोना महामारीच्या काळातील या अपघाताने मनाला यातना झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना स्पष्ट केले आहे.

Gold Rate
01 Aug 2025
Gold 24 KT 98,100 /-
Gold 22 KT 91,200 /-
Silver/Kg ₹ - ₹- ₹1,10,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान पायी चालत आपल्या मूळ गावी स्थलांतर करू इच्छिणाऱ्या लोकांचे बिकट प्रश्न ऐरणीवर आले आहेत असेही शरद पवार यांनी सांगितले आहे.

असंघटित क्षेत्रातील मजूर सद्यस्थितीत बेरोजगारीच्या भीतीने शहर सोडून जात असेल तर सर्वप्रथम त्याच्या रोजगाराच्या ठिकाणच्या कॉण्ट्रॅक्टर अथवा मालकाने त्यांची काळजी घ्यावी. ते शक्य होत नसल्यास सरकारला कळवावं असा सल्ला शरद पवार यांनी दिला आहे.

राज्य सरकारांनीही या स्थलांतरित मजुरांसाठी भरारी पथकांची नियुक्ती करून सातत्याने त्यांचा पाठपुरावा करून त्यांच्या गरजांबाबत काळजी घ्यावी अशी मागणी करतानाच केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रित येऊन तातडीने दखल घेऊन या प्रश्नांची सोडवणूक करावी अशी सूचनाही शरद पवार यांनी केली आहे.

Advertisement
Advertisement