Published On : Sat, Nov 3rd, 2018

रामटेक येथे नवनिर्वाचित न.पं. सदस्य व ग्रा.प. सरपंच तथा सदस्य यांचा भावपूर्ण सत्कार

रामटेक: भारतीय जनता पक्ष व गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या संयुक्त विद्यमाने चार वर्षे विजय दिवस कार्यक्रम तथा नवनिर्वाचित न.पं. सदस्य, सरपंच व सदस्यांचा सत्कार समारोह गांधी चौक, रामटेक येथे पार पडला.

या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी मल्लिकार्जुन रेड्डी, आमदार, रामटेक विधानसभा, राजे वासुदेवशाह टेकाम, प्रदेश अध्यक्ष व भाजपा नागपूर ग्रामीण चे जिल्हाअध्यक्ष डॉ राजीवजी पोतदार, संघटन मंत्री श्रीकांत देशपांडे, भारतीय जनता पार्टी चे ओबीसी मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विजय हटवार, अविनाश खडतकर तसेच प्रामुख्याने गोंडवाना गणतंत्र पार्टी चे जिल्हाध्यक्ष हरीश उईके, रामटेक नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सौ माधुरीताई भीमटे, उपाध्यक्ष न.प. पारशिवनी, जि.प.सदस्य सौ दुर्गाताई सरीयाम, पं.स. सभापती राजेश कडू, कैलास बरबटे, डॉ. दिनेश बादोले उपस्थित होते. यावेळी नवनिर्वाचित सदस्य व सरपंच यांचा सत्कार करण्यात आला.३३ ग्राम पंचायत सरपंच व सदस्यांनी स्वीकारला सत्कार नगर पंचायत पारशिवनी येथील १२ सदस्यांचा सत्कार.

रामटेक विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी ही नंबर 1 पार्टी असल्याने व आमच्या हाताने गावचा विकास करायचे असल्याचे मत सर्व सरपंच व सदस्यांनी कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.कार्यक्रमाप्रसंगी संबोधित करतांना भारतीय जनता पार्टी चे नागपूर जिल्हा अध्यक्ष डॉ राजीव पोतदार म्हणाले की, “निवडुन आलेल्या लोकांवर फार मोठी जवाबदारी आहे. आपण आता विकासासाठी झटलं पाहिजे. गावाच्या समस्या सोडविण्यासाठी सुवर्णसंधी तुम्हाला जनतेने दिलेली आहे. विकासाचे ध्येय ठेवून कार्य करीत राहा.”असे विचार व्यक्त केले. सभेला सबोधित करतांना रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यानी,”मी चार वर्षांपासून रामटेक चे प्रतिनिधित्व करीत असताना अनेक विकास कामे मार्गी लावले. सर्वांगीण विकास हेच आमचे ध्येय असून आम्ही समाजाच्या कल्याणासाठी कार्यरत राहू. लोकप्रतिनिधी जनतेच्या सेवेसाठी असून त्याने जनतेच्या विश्वासाचे सोने केले पाहिजे.


प्रामाणिकपणा मनात कायम ठेवून काम करणे हेच कर्तव्य आहे. शासन जनतेच्या हितासाठी असून जनतेचेही सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक माणूस महत्वाचा असून त्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.”असे विचार व्यक्त केले. यावेळी नगरसेवक अलोक मानकर , संजय बिसमोगरे, नगरसेविका लता कामडे , वनमाला चौरागडे बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे, उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले, अतुल हजारे, संजय मुलमुले ,राजेश ठाकरे , रेखा दूनेदार ,नीलिमा पालिवाल तसेच कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळी प्रामुख्याने मोठया संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर ढोक,,रवी चौहान उमेश रणदिवे ,उमेश पटले, रजत गजभिये, रामटेक तसेच सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी मंडळींनी प्रयत्न केले.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन राहुल किरपान यांनी तर आभार कृष्णा भाल यांनी मानले.

३३ ग्राम पंचायत सरपंच व सदस्यांनी स्वीकारला सत्कार नगर पंचायत पारशिवनी येथील १२ सदस्यांचा सत्कार.

रामटेक विधानसभा क्षेत्रात भारतीय जनता पार्टी ही नंबर 1 पार्टी असल्याने व आपल्या गावचा विकास झाला पाहिजे ह्याकरिता सर्व सरपंच व सदस्यांनी विकासाला प्रथम प्राधान्य देणार असल्याचे मत कार्यक्रम दरम्यान व्यक्त केले.