Published On : Mon, Jul 10th, 2017

ऊर्जाबचत ही काळाची गरज – अनिल सोले

Advertisement

नागपूर: ऊर्जाबचत ही काळाची गरज आहे. ‘पौर्णिमा दिवस’ हा उपक्रम ऊर्जाबचतीच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल आहे. नागरिकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन माजी महापौर आमदार अनिल सोले यांनी केले.

नागपूर महानगरपालिका व ग्रीन व्हिजील फाउंडेशनच्या वतीने सीए रोड येथील आंबेडकर चौक येथे शनिवारी (ता.८) पोर्णिमा दिना साजरा करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी महापौर प्रवीण दटके, माजी परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर, कार्यकारी अभियंता (विद्युत) संजय जैस्वाल, ग्रीन व्हिजीलचे संयोजक कौस्तव चॅटर्जी आदी उपस्थित होते.


यावेळी चौक परिसरातील पथदिवे, तसेच दुकांनातील बाहेरील अतिरिक्त दिवे रात्री ८ ते ९ या वेळेत अर्थात एक तास बंद करण्यात आले होते. कार्यक्रमाला लकडगंज झोनचे कनिष्ठ अभियंता राजेश भाजीपाले, मिलिंद साकोले, राहुल कुबडे, रवींद्र निंबोलकर, जगन राऊत, सुरभी जयस्वाल, शीतल चौधरी, पूजा लोखंडे, दिगंबर नागपुरे, अभय पौनीकर, मेहूल कोसरकर आदी उपस्थित होते.