
नागपुर,राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे येत्या रविवारला दिनांक 17/04/2022 ला मु गादा त कामठी जि नागपूर येथे होणाऱ्या अधिवेशनास(मेळावा) बहुद्देशीय तिरेळे कुणबी संघ विदर्भ प्रदेश यांच्या तर्फे जाहीर समर्थन
बहुद्देशीय तिरळे कुणबी संघ विदर्भ प्रदेश आमच्या या संघटनेचे संस्थापक मा श्री सुरेशजी गुडधे पाटील ,अध्यक्ष मा श्री जानरावजी केदार यांच्या अध्यक्षतेखाली आज दिनांक 08/04/2022 रोजी सभा घेण्यात आली त्या सभेमध्ये बहुद्देशीय तिरळे कुणबी संघा तर्फे तिरेळे कुणबी समाज सर्व शाखीय कुणबी समाज तसेच ओबीसी समाजातील सर्व जात संघटना व पदाधिकारी समाज बांधव सर्वांनी या होणाऱ्या जिल्हा स्तरीय अधिवेशनामध्ये (मेळावा) बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शहर अध्यक्ष श्री राजेश काकड़े यानि केले आहे, या मेळाव्यात केंद्र सरकार व राज्य सरकारशी निगडीत असलेल्या ओबीसी समाजाच्या मागण्या
यावर चर्चा होऊन त्याचे निवेदन व मागणी पत्र केंद्र सरकार व राज्य सरकारला देण्यात येईल . तसा ठराव करून घेण्यात येईल,
तरी सर्व ओबीसी प्रवर्गातील बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आव्हान आजच्या सभेमध्ये संस्थापक मा श्री सुरेशजी गुडधे पाटील,अध्यक्ष श्री जानरावजी केदार ,सचिव अशोक पांडव, सहसचिव श्री नरेश शेळके, कोषाध्यक्ष श्री वामनरावजी येवले, शहर अध्यक्ष श्री राजेश काकडे, यांनी आव्हान केले.
या सभेमध्ये कार्यकारणी सदस्य श्री नंदकिशोर गोहणे, श्री रमेश राऊत, श्री श्रीधर नहाते, श्री भाऊराव आमले, श्री वासुदेवराव आमले, श्री वासुदेवराव महाजन, श्री अनंता बारसागडे उपस्थित होते.








