Published On : Fri, Jun 30th, 2023
By Nagpur Today Nagpur News

इतवारी रेल्वे स्टेशनला ‘नेताजी सुभाषचंद्र बोस’ यांचे नाव !

नागपूर : इतवारी रेल्वे स्थानकाला अधिकृतपणे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे नाव देण्यात आले आहे. नेताजींच्या नावाचा उपसर्ग लावण्याबाबत राजपत्रातील अधिसूचना महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने १६ जून २०२३ रोजी प्रकाशित केली होती, असे पूर्व नागपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा खोपडे यांनी सांगितले.

हे लक्षात घ्यावे की नागपूर महानगरपालिकेने (NMC) 2022 मध्ये एकमताने रेल्वे स्थानकाला आझाद हिंद सेनेच्या संस्थापकाचे नाव देण्याबाबतचा ठराव मंजूर केला होता, ज्याने स्वातंत्र्यलढ्याला बळ दिले होते. हा ठराव महाराष्ट्र सरकारकडे पाठवण्यात आला . त्यानंतर हा विषय आपल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेतला . त्याला 23 ऑगस्ट 2022 रोजी मान्यता दिली.
प्रक्रियेनुसार, रेल्वे स्थानकाचे नामकरण करण्यापूर्वी केंद्र सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे. म्हणून, राज्याने नामकरणाचा प्रस्ताव 23 मे 2023 रोजी केंद्रीय गृह मंत्रालयाकडे सादर केला. गृह मंत्रालयाने या प्रकरणाला तातडीने मान्यता दिली . त्यानंतर महाराष्ट्र सरकारला कळवले.

Gold Rate
Monday 10 Feb. 2025
Gold 24 KT 85,600 /-
Gold 22 KT 79,600 /-
Silver / Kg 96,000 /-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

खोपडे म्हणाले की, ब्रिटीश राजवटीत येथे आठवडी भाजी मंडई चालत असे, त्यामुळे हा परिसर इतवारी म्हणून ओळखला जाऊ लागला. या परिसरात मनपाने नेताजी बोस यांचा पुतळाही खूप पूर्वी लावला होता. इतवारी रेल्वे स्थानकाला नेताजी बोस यांच्या नावाला मंजुरी दिल्याबद्दल त्यांनी राज्य सरकारचे आभार मानले. खोपडे म्हणाले, रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा मोलाचा वाटा आहे.

इतवारी रेल्वे स्थानक हे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या नागपूर विभागाच्या अखत्यारीत येते. भारतीय रेल्वेच्या NSG-4 श्रेणीतील आणि 6 प्लॅटफॉर्म असलेले हे स्थानक नागपूर रेल्वे स्थानकाला पूरक आहे. सुमारे 14 गाड्या स्टेशनवरून निघतात.

Advertisement