Published On : Mon, Apr 24th, 2017

विदर्भातील सर्वात चांगली सेवा नागपूर अग्निशमन दलाची- संजयकुमार बालपांडे

Sanjaykumar Balpande
नागपूर:
केवळ नागपूर शहरच नव्हे तर कोराडी, कामठी, कळमेश्वर यासह आजूबाजूचा ग्रामीण भाग, गावांतील शेती यांनादेखिल आग लागल्यास नागपूर मनपाचा अग्निशमन विभाग तत्परतेने धाव घेतो. जरी ग्रामीण भागात नगर परिषदांकडे त्यांची स्वत:ची अग्निशमन व्यवस्था असली तरी अनेकदा आपल्या विभागाला तात्काळ सेवा पुरवावी लागते. विदर्भातील सर्वात चांगली सेवा नागपूर अग्निशमन दलाची असल्याचे प्रतिपादन अग्निशमन व विद्युत विशेष समितीचे सभापती ॲड. संजयकुमार बालपांडे यांनी केले.

सोमवारी (ता. २४ एप्रिल) मनपाच्या स्थायी समिती सभागृहात अग्निशमन व विद्युत विशेष समितीची पहिली बैठक पार पडली. याप्रसंगी उपसभापती प्रमोद चिखले, सदस्य वीरेंद्र कुकरेजा, लहुकुमार बेहते, राजकुमार साहु, वनिता दांडेकर, सय्यदा बेगम मो. निजामुद्दीन अंसारी, ममता सहारे उपायुक्त रवींद्र देवतळे, सहायक आयुक्त महेश धामेचा आदी उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना श्री. बालपांडे म्हणाले, न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे लवकरच अग्निशमन विभागातील पदोन्नती व सेवाप्रवेशाची पदे भरण्यात येतील. पदोन्नतीसाठी न्यायालयाने ९ जूनपर्यंतचा अवधी दिला असला तरी पुढील महिन्यात मे मध्येच पदोन्नतीसंबधीचे सर्व प्रश्न सोडविले जाईल. एवढेच नव्हे तर सप्टेंबर महिन्यापर्यंत सेवाप्रवेशाबाबत मुदत मिळाली असली तरी त्यापूर्वीच शासनाने मंजूर केलेल्या ठराविक आकृतिबंधाप्रमाणे पदभरती केली जाईल.

नुकत्याच शहरात विविध ठिकाणी आग लागण्याचा घटना घडल्या. अग्निशमन विभागाने कुठे व कशा सेवा प्रदान केल्या याचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. वाठोडा, त्रिमूर्ती नगर येथील अग्निशमन प्रशिक्षण केंद्रांची विस्तृत माहिती त्यांनी घेतली. अग्निशमन व आणिबाणी सेवा विभागाशी संबंधित नवीन बांधकाम सुरू असलेली स्थानके व नवीन प्रस्तावित असलेली स्थानके याबाबतचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला.

Gold Rate
18 Aug 2025
Gold 24 KT ₹ 1,00,100 /-
Gold 22 KT ₹ 93,100 /-
Silver/Kg ₹ 1,15,400/-
Platinum ₹ 48,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

यावेळी त्यांनी मनपा हद्दीतील हॅड्रन्टच्या स्थितीबाबत माहितीही जाणून घेतली. दूषित विहिरीतून काढण्यात येणारा गाळ, कर्मचाऱ्यांची संख्या, विभागाच्या समस्या इत्यादीबाबत सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी प्रमुख अग्निशमन अधिकारी बी.पी.चंदनखेडे यांनी विस्तृत माहिती दिली. बैठकीला अग्निशमन विभागाच्या विविध केंद्रातील निगम अधीक्षक, स्थानकप्रमुख, आपत्ती व्यवस्थापक आदी उपस्थित होते.

Advertisement
Advertisement