Published On : Sat, Sep 2nd, 2017

वाड़ी परिसरात मुस्लिम बांधवा तर्फे बकरी ईद उत्साहात सम्पन्न,

Advertisement

वाड़ी(अंबाझरी): मुस्लिम बांधवांचा महत्वपूर्ण समजला जाणारा बकरी ईद नावाने ओळखला जाणारा सण वाड़ी परीसरातील मुस्लिम कुटुंबियानी धार्मिक परंपरेनुसार शनिवारी उत्साहात सम्पन्न केला.

ईद निमित्य मुस्लिम बांधवाणी सकाळला नविन वस्त्र धारण करुन विविध मस्जिद मधे नमाज अदा करुन् अल्लाहचे स्मरण केले. तदनंतर अनेक ठीकानी,कुटुंबात त्याग व बलिदानचे प्रतिक रुपात बोकडांचा बळी अर्पण केला,व या मासाचे भाग करुन् समाजातील गरीब परीवारात,परिचित,तसेच नात्यातील कुटुंबात वितरित केले.

वाडीतील सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम समाजाचे नेते रफीक भाई खान यांनी या सना चे महत्व कथन करताना सांगितले की अल्लाह यांनी दिलेल्या आदेश व मुलाचे प्रामाणिक बलिदान वाचऊन त्या ठिकाणी दुंबा नामक बोकड़ा चा बळी स्वीकारला,तेंव्हा पासून ईद उल जुहा हा सण बकरी ईद च्या रुपात मुस्लिम बांधव साजरा करतात,ज्यांची आर्थिक क्षमता चांगली आहे,ते गरीब लोकांनाही मदत करुन आनंदात सामिल करुन घेतात.

शनिवारी सर्व मुस्लिम बांधवांनी संध्याकाळी देखील नमाज अदा करुन परस्परांच्या घरी जाऊंन ईद च्या शुभेछ्या दिल्या,व दावत मधे देखील सामिल झाले.
ईद उल जुहा निमित्य वाड़ी नगराध्यक्षा प्रतीक्षा पाटिल, उपनगराध्यक्ष नरेश चरडे, मुख्याधिकारी राजेश भगत,शिवसेना नेते आशीष इखनकर,री पा ई नेते दिनेश बंसोड़,नगरसेवक नरेंद्र मेंढे, कॉंग्रस नेते अनिल पाटिल, प्रकाश कोकाटे, अश्वविन बैस, इस्ताक भाई खान,कर्मचारी नेते पि के मोहनन,आदी नी शुभेछ्या दिल्या.शांतता व सुरक्षेसाठी वाड़ी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.