Published On : Mon, May 21st, 2018

शिक्षणमंत्र्यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना दिली दहशतवाद व हिंसाचारविरोधी शपथ

मुंबई : दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज मंत्रालयात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यावेळी श्री. तावडे यांनी दहशतवाद व हिंसाचारविरोधातील शपथ दिली.

जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, विविध विभागाचे अधिकारी तसेच कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दहशतवाद व हिंसाचाराविरोधात लढण्याची व समाजात शांती, सामाजिक एकोपा, सामंजस्य टिकविण्याची तसेच मानवी जिवितमूल्य धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करण्याची शपथ घेतली.