कन्हान: जवळील गोंडेगाव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथे (दि.२९) ला गोवर रूबेला लसीकरण कार्यक्रम पार पडला.
ग्रामीण परिसरातील पहिल्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडेगाव येथे मोहिमेचे उद्घाटन पंचायत समिती उपसभापती जिवलंग पाटील यांच्या हस्ते व सरपंच नितेश राऊत यांच्या अध्यक्षेत करण्यात आले . या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सचिव आर जी पालांदुरकर, ग्रा प सदस्य सौ. पुजा रासेगावकर, आशिमा वासनिक, सुभाष डोकरीमारे, सुनिल धुरिया, मोरेश्वर शिंगणे, आकाश कोडवते, ललीता पहाडे, निर्मला सरवरे, यशोदा शेंदरे, रेखा काळे उपस्थित होते.
उपस्थित पाहुण्यांनी गोवर रुबेला लसीकरण जनजागृती मोहीमेंतर्गत मार्गदर्शन करुन नऊ महिने ते १५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला लसीकरण करावे असे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन आरोग्य सहाय्यक एस आर पारधी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एम पी डब्ल्यू एच एस पराते , वालदे , सुनिता रेवतकर, वंदना बुटोलिया , बबीता पानतावणे , सविता बागडे , आम्रपाली पाटील, निर्मला पवार यांनी सहकार्य केले .
