Advertisement
नागपूर : रेल्वेच्या परिसरातून वाहणा-या शक्ति नाल्याचे निरीक्षण महापौर श्री. दयाशंकर तिवारी यांनी नुकतेच केले. यावेळी त्यांच्या सोबत मध्य रेल्वेचे विभागीय अभियंता एच.के.शर्मा व वरिष्ठ अनुभाग अभियंता गोपाल पाठक उपस्थित होते.
महापौरांनी रेल्वे अधिका-यांना नाल्याची सफाई, गेब्रीयन बांध चे बांधकाम आणि नाल्याच्या सुरक्षित भिंतीची डागडुजी करण्याची सूचना केली. रेल्वे अधिका-यांनी या सूचनेला सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी मनपाचे सहाय्यक आयुक्त विजय हुमणे, आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार आणि कार्यकारी अभियंता गिरीश वासनिक उपस्थित होते.