Published On : Sun, Mar 15th, 2020

महापौरांचा आसीनगर, मंगळवारी झोनचा जनता दरबार स्थगित

नागपूर : ‘कोरोना’च्या प्रसारावर प्रतिबंध लागण्याच्या हेतूने शासनाच्या दिशानिर्देशानुसार सार्वजनिक कार्यक्रम स्थगित करण्यात येत आहे.

आशीनगर झोन क्र. ९ येथे सोमवार, १६ मार्च रोजी आणि मंगळवारी झोन क्र. १० येथे सोमवार, २३ मार्च रोजी महापौर संदीप जोशी यांचा जनता दरबार आयोजित करण्यात आला होता. मात्र, ‘कोरोना’मुळे सदर जनता दरबार स्थगित करण्यात आला आहे.

जनता दरबाराची पुढील तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असे महापौर कार्यालयातून सांगण्यात आले.