Published On : Sun, Mar 15th, 2020

लुटणाऱ्या टोळीच्या गुन्हे शाखा पोलीसांनी केला पर्दाफाश

कन्हान : – किशोर गिरधर मंगळुकर वय ३० रा.टिचर काॅलनी, न्यु येरखेडा कामठी हे दि.८ मार्च रोजी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान कामठी वरून कन्हान मार्गे तारसा रोडने अॅक्टीवा मोपेड दुचाकीने जात असताना, तीन युवक दोन दुचाकीवरून येऊन किशोर याला पेट्रोलपंप कुठे असल्याचे विचारत दिशा भूल करीत चाकुने वार करून जखमी अवस्थेत त्याचा जवळील अॅक्टीवा मोपेड दुचाकी, ओप्पो कंपनीचा मोबाई ल हॅण्डसेट व त्याचा जवळील तीन हजार रूपये जबरीने हिसकावून पळुन गेले.

किशोर मंगळुकर याने कन्हान पोलीस स्टेशन ला घटनेची माहीती दिल्याने पोलीसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदवून गोपनीय खात्रीशीर माहितीचा आधारे स्थानिय गुन्हे शाखेचे पथकाने आरोपी यश मुकेश माहतो वय १९ रा.पिपरी कन्हान याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सोबत दोन नाबालिक बालकांचा समावेश असल्याचा कबुल केले.

त्यांचा कडुन गुन्ह्य़ातील किशोर याची मोपेड दुचाकी, मोबाईल, रोख रक्कम तीन हजार रूपये तसेच जखमी करण्यासाठी वापरण्यात आलेला धारधार चाकु, दोन दुचाकी हे देखील जप्त करण्यात आली. अशा प्रकारे एकुण २००३०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.


गुन्हे शाखेने गुन्हा उघडकीस आणुन गुन्ह्य़ा तील सर्व मुद्देमाल जप्त केल्याबद्दल पोलीस अधीक्षक यानी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाचे कौतुक केले. सदरची कार्यवाही गून्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनील जिट्टावार याचे आदेशाने पोउपनी सचिन मत्ते, सूरज परमार, शैलेश यादव, सत्यशील कोठारे, प्रणय बनाफर, विरेंद्र नरड, साहेबराव बहाळे यांचा पथकाने कार्यवाही केली.