Published On : Mon, Feb 26th, 2024
By Nagpur Today Nagpur News

मराठा समाजाचे आंदोलन चिघळले; जालन्यात एसटी बस पेटवली!

Advertisement

जालना : राज्य सरकारने सगसोयऱ्यांसदर्भात कायदा केला नाही म्हणून मराठा बांधवानी राज्यभरात आक्रमक पवित्रा घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे. अंबड तालुक्यातील तीर्थपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा आंदोलकांनी राज्य परिवहन बस पेटवली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाकडून राज्य सरकारविरोधात निदर्शने सुरू आहेत.

एकीकडे आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवशेन सुरू होत आहे. शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, राजकारणाचे गुन्हेगारीकरण यासह विविध मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मराठा आरक्षणासाठी पुकारलेले आंदोलन अधिक तीव्र होत चालले आहे.

Gold Rate
20 May 2025
Gold 24 KT 93,400/-
Gold 22 KT 86,900/-
Silver/Kg 95,700/-
Platinum 44,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

दरम्यान सरकारला सगेसोयरे याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. देवेंद्र फडणवीसांविरोधात नाराजीची प्रचंड लाट उसळेल. अधिवेशनाच्या आधी सगेसोयरेबाबत निर्णय घ्यावा. देवेंद्र फडणवीसांच्या माहितीशिवाय जिल्हाधिकारी संचारबंदीचा निर्णय घेऊ शकत नाहीत. फडणवीस यांच्यात दम नाही. हे छत्रपती शिवरायांचे राज्य आहे. राज्यकर्त्यांना असले वागणे शोभत नाही. त्यांचा डाव आम्ही आधीच ओळखला, असा गंभीर आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला.

Advertisement
Advertisement
Advertisement