Published On : Wed, Sep 6th, 2017

लॉयनेस क्लब कन्हान कोलसिटी व्दारे “शिक्षक दिवस” साजरा.

कन्हान : – लॉयन्स /लॉयनेस क्लब कन्हान कोलसिटी द्वारे मारोतराव पानतावणे महाविद्यालय कांद्री- कन्हान येथे चार शिक्षकांचा सत्कार करून “शिक्षक दिन ” थाटात साजरा करण्यात आला.

मंगळवार दि.५ सप्टेंबर २०१७ ला सकाळी ११ वाजती ‘मारोतराव पाणतावने’ महाविद्यालय कांद्री-कन्हान येथे लॉयन्स / लॉयनेस प़़दाधिका-यांच्या हस्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. सौ.वनिता भिवगडे खापर्डे काँलेज नागपूर, सौ वसूंधरा मरघडे पाणतावने काँलेज,श्री सतीश कुथे,यशवंत विद्यलय वराडा.प्रबोधन मेश्राम पानतावणे काँलेज यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच पानतावणे, महाविद्यालयाच्या विद्यार्थ्या व्दारे उपस्थितीत सर्व शिक्षक, शिक्षिकांना स्म्रूतीचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

याप्रसंगी विद्यार्थ्यानी शिक्षक दिनाचे महत्व भाषण व गिताच्या माध्यमातुन सादर करून सर्व शिक्षक, शिक्षिकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्या दिल्या. कार्यक्रमाच्या यशस्विते करिता लॉयन्स/लॉयनेस क्लब कन्हान कोलसिटीचे अध्यक्षा लायनेस डाँ हेमलता जुनघरे,सचीव भावना पोटभरे,रीता सप्रा,कस्तूरी मालवीय, वैशाली डोणेकर,आशा खंडेलवाल,उषा पोटभरे,सविता नितनवरे, लायन्स कल्ब चे अध्यक्ष गोपिचंदजी ईखार,सचीव रंगराव पोटभरे,भगवानजी नितनवरे,योग सप्रा,अशोक भिवगडे,मालवीय सर,हिरालाल अग्रवाल,, हरीश नागपूरे, आणि पानतावणे काँलेज चे संचालक लाँ गणेश पाणतावने, कॉलेज चे विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले. कार्यक्रमास गणमान्य, प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.