Advertisement
सातारा/पाटण : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या पवित्र समाधी स्थळाचे अजितदादा, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी दर्शन घेत पुष्पचक्र अर्पण केले आणि पुन्हा एकदा यशवतंराव चव्हाणांच्या विचारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार येवू दे अशी प्रार्थना केली.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हल्लाबोल आंदोलन सातारामध्ये सुरु असून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड प्रितीसंगमावरील समाधीवर जावून अजितदादा, सुनिल तटकरे, धनंजय मुंडे, जयंत पाटील यांनी दर्शन घेतले. त्यांच्यासमवेत राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे असंख्य आमदार, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Advertisement