Published On : Tue, Jun 3rd, 2025
By Nagpur Today Nagpur News

आमदार संदीप जोशींच्या जनसंपर्क कार्यालयातून समाजातील शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळेल; महसूल मंत्री बावनकुळे यांचे विधान

Advertisement

नागपूर : समाजातील दुःखीतांचे अश्रू पुसून त्यांना न्याय देण्याचा आमदार संदीप जोशी यांचा पिंड आहे. जनसंपर्क कार्यालयातून समाजातील अशाच दुःखीतांना, शेवटच्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचे कार्य होतील, असा विश्वास राज्याचे महसूल मंत्री तथा भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला.

सोमवारी २ जून २०२५ रोजी आर.पी.टी.एस. रोड, लक्ष्मीनगर येथे आमदार श्री. संदीप जोशी यांच्या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार प्रा. अनिल सोले, आमदार डॉ. परिणय फुके, प्रवीण दटके, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, माजी आमदार नागो गाणार, आर्वी चे आमदार सुमीत वानखेडे, वरोरा चे आमदार संजय देवतळे, नरेश बरडे आदी उपस्थित होते.

Gold Rate
Feb 9th, 2026 - Time 11.45Hrs
Gold 24 KT ₹ 1,57,400 /-
Gold 22 KT ₹ 1,46,400 /-
Silver/Kg ₹ 2,63,000 /-
Platinum ₹ 90,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

पुढे बोलताना ना. श्री. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्य विकसीत महाराष्ट्र म्हणून वाटचाल करीत आहे. विकसीत महाराष्ट्राची संकल्पना पूर्ण करताना अडचणीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचे काम आमदार श्री. संदीप जोशी करणार आहेत. महाराष्ट्र राज्यात जनतेच्या हितासाठी विधिमंडळात धोरणात्मक निर्णय घेतले जातात. जनतेच्या समस्या, त्यांचे प्रश्न समजून त्यांना विधिमंडळातून न्याय देण्याचे कार्य आमदार जोशी करतील, असाही विश्वास ना.श्री. बावनकुळे यांनी व्यक्त केला. आमदार म्हणून संदीप जोशी यांनी दोन महिन्यातच मंत्रालय व विधिमंडळातील कामकाज समजून घेण्यात यश मिळविल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

प्रास्ताविक आमदार संदीप जोशी यांनी केले. आज गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या उभारणीसाठी परिश्रम घेतलेल्या सुरुवातीपासून ते आजपर्यंतच्या राष्ट्रीय अध्यक्षांचे फोटो कार्यालयात लावण्यात आल्याचे त्यांनी नमुद केले. जनसंपर्क कार्यालयातून जनतेच्या समस्या सोडवल्या जातील. शिवाय दीनदयाल थाली आणि श्री. सिद्धिविनायक सेवा ट्रस्टद्वारे सुरु असलेल्या सामाजिक उपक्रमांना देखील गती मिळेल, असे ते म्हणाले.

माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी जनसंपर्क कार्यालयाच्या लोकार्पणानिमित्ताने आमदार श्री. जोशी यांचे अभिनंदन केले. जनतेच्या हितासाठी नेहमी कल्पक उपक्रम राबविणारे जोशी यांचे कार्यालय देखील कल्पक आहे. त्यांच्या जनसंपर्क कार्यालयातून जनतेच्या हिताच्या योजना राबविल्या जातील व जनसेवेच्या कार्याची पूर्तता होईल, असेही ते म्हणाले.

भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी आमदार संदीप जोशी यांना शुभेच्छा देताना त्यांच्या कार्याचा गौरव केला.

कार्यक्रमात श्री. सिध्दीविनायक सेवा ट्रस्ट द्वारे संचालित ‘सोबत पालकत्व’ प्रकल्पातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन भाजपा धंतोली मंडळाचे अध्यक्ष विनोद शिंदे यांनी केले व आभार विनय दाणी यांनी मानले.

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement