Published On : Mon, Jun 8th, 2026
By Nagpur Today Nagpur News

पिकनिकचा आनंद क्षणात दुःखात; कन्हान नदीतील महादेव घाटावर चिमुकल्यासह तिघांचा बुडून मृत्यू

Advertisement

नागपूर : नागपूर जिल्ह्यातील कामठीजवळील कन्हान नदीच्या महादेव घाटावर रविवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. पिकनिकसाठी आलेल्या दोन कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नदीतील खोल डोहात बुडणाऱ्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात आणखी दोघांनी जीव गमावला. या दुर्घटनेत चिमुकल्यासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

रविवारची सुट्टी साजरी करण्यासाठी कामठी आणि नागपूर येथील दोन कुटुंबे कन्हान नदीकाठावरील महादेव घाट येथे आली होती. दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास कुटुंबातील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त असताना 6 वर्षीय चैतन्य आंबाडे नदीकिनारी खेळत खेळत खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला.

Gold Rate
Aug 27 ,2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1 60,000 /-
Gold 22 KT ₹ 1,48,500 /-
Silver/Kg ₹ 2,41,500/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

चैतन्यला वाचवण्यासाठी त्याचे काका गौतम आंबाडे यांनी तत्काळ नदीत उडी घेतली. मात्र त्यांना पोहता येत नसल्याने तेही पाण्यात अडकले. गौतम यांना बुडताना पाहून तेथे उपस्थित असलेले रोहित नागदेव मदतीसाठी नदीत उतरले. दुर्दैवाने त्यांनाही पोहता येत नसल्याने तेही खोल डोहात बुडाले. काही क्षणांतच तिघेही पाण्याखाली गेले.

Advertisement

दरम्यान, गौतम यांचे वडील राजकुमार आंबाडे यांनीही बचावासाठी नदीत उडी घेतली. मात्र त्यांनी मोठ्या प्रयत्नांनी स्वतःचा जीव वाचवला. या घटनेनंतर परिसरात एकच आक्रोश पसरला.

घटनेची माहिती मिळताच जुने कामठी पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सहाय्यक पोलीस निरीक्षक मनीष हिवरकर आणि उपनिरीक्षक सागर भंडारी यांनी स्वतः नदीत उतरून शोधमोहीम राबवली. त्यानंतर तिघांचेही मृतदेह नदीतून बाहेर काढण्यात आले.
एका निष्पाप चिमुकल्याला वाचवण्याच्या प्रयत्नात तीन जणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेने नदी, तलाव आणि जलाशय परिसरात सुरक्षिततेच्या नियमांचे पालन किती महत्त्वाचे आहे, याची पुन्हा एकदा जाणीव करून दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Advertisement
Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से हत्या! #NagpurNews #Crime #MurderCase #News

Nagpur शराब के पैसों को लेकर भाई ने भाई की चाकू से...

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का आरोप.. #NagpurNews #POCSOCase #Crime #News

16 साल की नाबालिग को शादी का झांसा देकर यौन शोषण का...

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Jalgaon में नकली देशी शराब की फैक्ट्री का भंडाफोड़!#FakeLiquor #MaharashtraNews #Excise #CrimeNews

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप #NagpurNews #POCSOCase #NagpurCrime #News

Nagpur Crime: 14 साल की बेटी के कथित यौन शोषण का आरोप...

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

एनआईटी कार्यालय में महिला कर्मचारी से छेड़छाड़ का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

भिवंडी में खेत की जमीन पर कब्जे का आरोप

GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges