Published On : Tue, Jan 8th, 2019

रामटेक येथे राज्य स्तरीय भव्य कृषी समृद्धी महोत्सवाचे उदघाटन

Advertisement

महाराष्ट्र शासन कृषी व पशुसंवर्धन विभाग,कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सहकार्याने कृषी समृद्धी महोत्सव 2018 -19 राज्य स्तरीय कृषी व पशु प्रदर्शनी आणि शेतकरी मेळाव्याच उदघाटन नुकतेच रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी यांचे हस्ते करण्यात आले.

नेहरू ग्राउंड येथे होऊ घातलेल्या या भव्य कृषी प्रदशनी मध्ये बीज ,कीटकनाशके, मोटार फवारणी, ट्रॅकर, शेतीला उपयुक्त उपकरणे,सिंचनाची साधने,ग्रीन हाऊस ,खाद्यपदार्थ तसेच गृहपयोगी वस्तूंचे ,शेतीकरिता रोजगार समूह बचत गट आणि पशु संवर्धन,मत्स्य विभाग,रेशीम उद्योग, समाजिक वनीकरण, सौरऊर्जा तसेच पीक विमा, पीक कर्ज फलोत्पादन, दुग्धव्यवसाय, मोफत मातीपरिक्षण ईत्यादी प्रक्षिशन स्टॉल लावण्यात आले आहे.शेतकाऱ्यांकरीता राबविण्यात येणाऱ्या समस्त योजनांची माहिती जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचावी व त्यासंदर्भातील माहिती एकाच ठिकाणी प्राप्त व्हावी हा एकच उद्देश ठेऊन यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे आमदार मल्लिकार्जुन रेड्डी आपल्या उदघाटन पर भाषणात सांगितले.

ह्यावेळी आमदार मल्लिकार्जुन रेड्डी उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे, तहसीलदार धर्मेश फुसाटे ,मुख्याधिकारी जुम्मा प्यारेवाले ,यांचे हस्ते शेतकऱ्यांना ४० हजार व १ लाख रुपयांचे अनुशेशाचे प्रमाणपत्र देण्यात आले. ह्यावेळी माजी भारतीय खाद्य निगम सदस्य विजय हटवार, शेतकरी किसान नेते नरेंद्र बंधाटे,कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्य प्रशासक किशोर रहांगडाले ,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे उपविभागिय कृषि अधिकारी, अंबादास मिसाळ,.

तालुका कृषी अधीकारी, बडोले तालुका कृषी अधीकारी पारशिवनी गच्चे , ताकृअ मौदा वासनीक डॉक्टर नगराळे, केंद्रीय कापूस संशोधन संस्था, नागपुर। डॉ. नवलाखे,कृषि विआदी मान्यवर उपस्थित होते.ह्यावेळी रामटेक, मौदा ,पारशिवनी व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.दरम्यान जांगळगुथा हा विनोदी हास्य कार्यक्रम रामपाल महाराज यांनी सादर केला.