Published On : Tue, Jan 8th, 2019

साहित्य सम्मेलनाकरीता कवी प्रशांत जांभुळकर यांच्या कवितेची निवड

Advertisement

रामटेक:- येथील जिल्हापरिषद शाळेचे शिक्षक ,तबलावादक तथा प्रसिद्ध बालकविताकार कवी प्रशांत जांभुळकर यांच्या कवितेची मराठी साहित्य सम्मेलनात सादरीकरणाकरीता निवड करण्यांत आली.

दि.११ते१३जानेवारीला यवतमाळ येथे डाॅ वि.भि. कोलते संशोधन केंद्र व वाचनालय,तथा विदर्भ साहित्य संघ शाखा यवतमाळ आयोजित ९२वे अखिल भारतीय मराठी साहित्य सम्मेलनातील कविकट्टा या काव्यमंचावर कविता सादर करण्यासाठी कवी प्रशांत जांभुळकर यांना निमंत्रित करण्यांत आले असून त्यांच्या ‘लाख मोलाची गोष्ट’ या कवितेची सादरीकरणासाठी निवड करण्यांत आली.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डाॅ श्रीपाद भालचंद्र जोशी हे अध्यक्ष तर नामदार मदन येरावार पालकमंत्री हे स्वागताध्यक्ष आहेत.कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.रमाकांत कोलते,राजन लाखे,प्रा.विनोद भगत यांचे निवड तथा निमंत्रण पत्र प्रशांत जांभुळकर यांना नुकतेच प्राप्त झाले .

केंद्रप्रमुख राजकुमार पचारे, एस पी कुवारे जगदीश किरमिरे,सतीश पुंड, भगवान बिसने,राजेश पारधी,अशोक चवरे, जगदीश इनवाते,विकास गणवीर महेंद्र सोनवाने अशोक उइके योगेश वासाडे,दिनेश पाचपुते,अशोक लोहकरे यांनी प्रशांत जांभुळकर यांचे अभिनंदन केले.