Published On : Mon, Jul 2nd, 2018

अवैध धंदे व असामाजिक तत्वावर अंकुश लावण्यात यावा

Advertisement

कन्हान : – शहरा व परिसरात अवैध धंंद्याचा उत येत असुन असामाजिक तत्वावराचा बोलबाला दिवसेंदिवस वाढत असल्याने सर्वसामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे . यास्तव अवैध धंदे व असामाजिक तत्वावर अंकुश लावण्यात यावा. अशी मागणी कन्हान डी वाय एस पी ईश्वर कातकडे यांना कन्हान विकास मंचाच्या शिष्टमंडळाने निवेदन देऊन केली आहे.

कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत शहर व परिसरात अवैध धंंद्याचा उत येत असुन असामाजिक तत्वावराचा बोल बाला दिवसेंदिवस वाढत असल्याने रेती, कोळशा, मँग्नीज स्कँप दगड चोरी , घरफोडी वाढल्याने दिवसेंदिवस शहरात व परिसरात वर्चस्वाकरिता दोन गटात संघर्षात गोळीबार व तीन दिवसा नंतर कोळशा माफिया विनोद सोमकुवर याची भरदिवसा महामार्गावर तलवारीने हत्या करण्यात आली. यामुळे सर्वसामान्य नागरिकात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे .

करिता अश्याप्रकार च्या घटनांवर व अवैध धंद्यावर लगाम लावण्यासाठी कन्हान पोलीस स्टेशन मध्ये पोलीस कर्मचारी वाढवुन अवैध धंदे व असामाजिक तत्वावर अंकुश लावण्यात यावा. अशी मागणी कन्हान डी वाय एस पी ईश्वर कातकडे यांना कन्हान विकास मंचचे अध्यक्ष वृषभ बाववकर यांचा नेतृत्वात शिष्टमंडळ भेटुन निवेदन देऊन मागणी करण्यात आली .शिष्टमंडळात उपाध्यक्ष माधव वैध , धमेंन्द्र गणवीर, चंदन मेश्राम , हर्ष पाटील , हरीओम प्रकाश नारायन , अक्षय फुले , राकेश लंगडे आदी प्रामुख्याने उपस्थितीत होते .