Published On : Mon, Sep 21st, 2020

संतापाच्या भरात सोडले घर, गाठले रेल्वे स्थानक

Advertisement

-नोकरीसह आता शिक्षणही करण्याचा निर्धार,लोहमार्ग पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ती सुखरुप


नागपूर: कोरोना काळात इतरांप्रमाणे त्यांच्यावरही आर्थिक संकट कोसळले. या संकटातून बाहेर पडण्यासाठी तिचा प्रयत्न सुरू होता. तिच्या प्रयत्नाला यश मिळत असताना वडिलांनी तिला खाजगी नोकरीसाठी विरोध दर्शविला. या प्रकरामुळे ती संतापली आणि रागाच्या भरात घर सोडले. थेट रेल्वे स्थानक गाठले. पुण्या, मुंबईला जावून नोकरीसह शिक्षण करणार असा निर्धार करुन ती रेल्वेत बसणार तोच कर्तव्यदक्ष पोलिस कर्मचारी चंद्रशेखर मदनकरने तिची विचारपूस केली आणि या प्रकरणाचा उलगढा झाला. यानंतर तिला कुटुंबीयांच्या सुपूर्द करण्यात आले. हा प्रकार शुक्रवारी दुपारच्या सुमारास नागपूर रेल्वे स्थानकावर उघडकीस आला.

उत्तर नागपुरातील रिया (काल्पनिक नाव) अंत्यत हुषार. अलिकडेच ती बारावी पास झाली. गरीबीचे चटके सहन करुनही तिने ८४ टक्के गुण मिळविले. अल्पवयीन असलेल्या रियाच्या कुटुंबात आई, वडिल, दोन लहान भाउ आहेत. वडिल खाजगी काम करतात.

कोरोनामुळे देशाची अर्थव्यवस्था थांबली. पर्यायाने हातावर आणून पाणावर खाणाèयांसमोर जगण्याचा आणि जगविण्याचा प्रश्न निर्माण झाला. आर्थिक गाडी रुळावर आणण्यासाठी कुटुंबातील सदस्यही हातभार लावण्याचा विचार करीत असून त्या दिशेने प्रयत्न करीत आहेत. अशातच रिया कामाच्या शोधात घराबाहेर पडली. जवळ जवळ काम मिळणेही पक्के झाले. मात्र, रियाने आत्ताच बाहेर कामाला निघण्यासाठी वडिलांचा विरोध होता. यावरून रिया आणि वडिल यांच्यात वाद व्हायचा. शुक्रवारी सुध्दा याच विषयावरून वाद झाला. तिच्या मनात राग होताच. शुक्रवारी सकाळी मी जाते एवढेच सांगुन ती घराबाहेर पडली. महाविद्यालयात जात असावी, असे आईला वाटले. मात्र, बराच वेळ होवूनही ती परतली नाही.

रिया महाविद्यालयात गेली. महत्वाचे कागदत्रे घेतली आणि पायीचे रेल्वे स्थानकाच्या दिशेने निघाली. दुपारी २ वाजताच्या सुमारास ती रेल्वे स्थानकवर पोहोचली. तिच्या हाती एक फाईल होती. त्यात शालेय प्रमाणपत्रे होती. अल्पवयीन, एकटीच आणि चिंतातूर स्थितीत असल्याचे पाहून कर्तव्यदक्ष पोलिस शिपाई चंद्रशेखर मदणकर यांना शंका आली. त्यांनी रियाची आस्थेनी विचारपूस केली. फाईल पाहल्यावर आणखीच शंका बळावली.

मात्र, सखोल चौकशीअंती ती संतापाच्या भरात घरुन पुण्या मुंबईला नोकरीच्या शोधात जात असल्याचे निष्पन्न झाले. नोकरीसोबतच शिक्षणही करण्याचा तिचा विचार होता. मात्र, वेळीच तिला आळकाठी बसल्याने पुढील अनर्थ टळला. उपनिरीक्षक रवी वाघ, खांडेकर आणि गोंडाणे यांनी तिची आस्थेनी विचारपूस केली. तिची समजूत घातली. तिच्या चेहèयावर हास्य फुलविल्यानंतर कुटुंबीयांना माहिती दिली. काही सायंकाळपर्यंत आई लोहमार्ग ठाण्यात आली. पोलिसांनी चौकशी केली. कागदोपत्री कारवाईनंतर रियाला आईच्या सुपूर्द केले.